मुंबई:
'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीझनमध्ये गणेश गायतोंडे आणि सरताजची कथा काय वळण घेणार हे माहीत नाही, पण हे दोघं कसे दिसतील हे मात्र आता प्रेक्षकांना समजणार आहे. नेटफ्लिक्स इंडियानं सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्धिकीचे 'सेक्रेड गेम्स २' मधील लुक प्रदर्शित केले आहेत.
नेटफ्लिक्सनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गणेश गायतोंडे सुटाबुटात दिसतोय. 'पिछली बार क्या बोला था गणेश भाईको? औकात...' असं या फोटोसोबत लिहिलंय. सरताजचा फोटोदेखील यावेळी शेअर करण्यात आलाय. 'अगर सरताज को सिस्टम बदलना है, तो खेल तो खेलनाही पडेगा' असं म्हणत पुढच्या सीझनमध्ये सरताज वेगळ्या अवतारात दिसणार असं सुचवण्यात आलंय.
'सेक्रेड गेम्स'च्या या नव्या सीझनची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला आहे. या नव्या सीझनमध्ये कल्की कोचलीन आणि रणवीर शौरीदेखील दिसणार आहेत. परंतु, सीझन सुरू कधी होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.