अ‍ॅपशहर

प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावत' चित्रपटाचा पेड शो

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध होत असून काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरी 'पद्मावत'च्या टीमनं चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जोमानं तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 11:25 am
मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध होत असून काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरी 'पद्मावत'च्या टीमनं चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जोमानं तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paid show of padmaavat will be organise before release
प्रदर्शनापूर्वीच 'पद्मावत' चित्रपटाचा पेड शो


'पद्मावत'च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २४ जानेवरीला चित्रपटाचा 'पेड प्रिव्ह्यू शो' आयोजित केला आहे. पैसे खर्च करून कोणालाही चित्रपट पाहता येईल. चित्रपट पाहून प्रेक्षकांकडून चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होतील व 'पद्मावत'बद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होईल, या उद्देशानं या शोचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय.

२५ जानेवारीलाच अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ ही प्रदर्शित होणार आहे. यामुळं या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होतेय. ‘पद्मावत’चा वाद आणि पॅडमॅन, मनोज वाजपेयी स्टारर 'अय्यारी' या चित्रपटांशी होणारी स्पर्धा पाहता निर्मात्यांना कोट्यवधीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत नुकसान टाळण्यासाठी सध्या निर्मात्यांचा आटापिटा सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज