अ‍ॅपशहर

लोकं म्हणायचे, 'मी दहशतवाद्यांच्या देशातली'

सलमान खानच्या 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरिना हुसेन मूळची अफगाणिस्तानची आहे. त्यामुळे पण सुरुवातीला तिला दहशतवाद्यांच्या देशातून आलीस, असं बोललं जात होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2018, 7:26 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम warina-hussen


सलमान खानच्या 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरिना हुसेन मूळची अफगाणिस्तानची आहे. त्यामुळे पण सुरुवातीला तिला दहशतवाद्यांच्या देशातून आलीस, असं बोललं जात होतं. मुंबईमध्ये येण्याआधी वरिना दिल्लीत राहात होती. ती एक मॉडेल आहे.

'त्या वेळी माझी आजी म्युझिक कॉन्सर्ट पाहायला जाण्यासाठी स्कर्ट घालून आजोबांसोबत बाइकवर फिरत असे. एक वेळ असा होता जेव्हा भारतात मला दहशतवाद्यांच्या देशातून ही आली, असं म्हटलं जात होतं. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता अफगाणिस्तानमध्ये मुली कॉलेज आणि विद्यापीठात शिकण्यासाठी जात आहेत. सध्या अफगाणिस्तानची आरोग्य मंत्री देखील एक महिला आहे. तिथला चित्रपट उद्योग अद्याप विकसित झालेला नाही. परंतु, म्युझिक इंडस्ट्री वेगाने वाढत गेली आहे' असं वरिनाने तिच्या देशाबद्दल सांगितलं.

माझी आई काही मोजक्या महिलांपैकी एक होती ज्या अफगाणिस्तानमध्ये कार चालवत होत्या, असं वरिनाने सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज