अ‍ॅपशहर

हृतिक-कंगना वादात राकेश रोशन यांची उडी

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादात आता हृतिक रोशन याचे वडील व निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी उडी घेतली आहे. 'आम्ही कुणाबद्दलही अपशब्द वापरत नाही. तसंच, पुराव्याशिवाय कोणावर आरोपही करत नाही,' असा टोला राकेश रोशन यांनी कंगनाला हाणला आहे.

Maharashtra Times 5 Oct 2017, 2:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakesh roshan opens up about kangana hritik debacle
हृतिक-कंगना वादात राकेश रोशन यांची उडी


अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वादात आता हृतिक रोशन याचे वडील व निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी उडी घेतली आहे. 'आम्ही कुणाबद्दलही अपशब्द वापरत नाही. तसंच, पुराव्याशिवाय कोणावर आरोपही करत नाही,' असा टोला राकेश रोशन यांनी कंगनाला हाणला आहे.

हृतिक आणि कंगनातील कथित अफेअर मीडियात आल्यापासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडंच 'सिमरन' चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळी कंगनानं हृतिकवर नाव न घेता अनेक आरोप केले होते. कंगनाच्या सततच्या आरोपांना कंटाळून हृतिकनं मुंबई पोलिसांकडं तक्रार केली आहे. या प्रकरणी राकेश रोशन आपल्या मुलाच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना राकेश रोशन यांनी कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. 'आम्ही कुणाबद्दलही अपशब्द वापरत नाही. पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही. पुराव्याच्या आधारावरच आम्ही तक्रार केली आहे,' असं ते कंगनाचं नाव न घेता म्हणाले.

'सत्य बाहेर आल्यानंतर सगळे हैराण होतील. 'आमच्या बाजूनं जे काही सांगायचं आहे ते आम्ही पोलिसांच्या सायबर शाखेला सांगितलं आहे. आमच्याकडं असलेली सर्व कागदपत्रं, सर्व ई-मेल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. कोण खरं आहे हे आता अधिकारीच ठरवतील. आम्ही हृतिकला नेहमीच चांगली शिकवण दिली आहे. त्यामुळं सत्य काय आहे ते लवकरचं समोर येईल,' असंही राकेश रोशन म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज