अ‍ॅपशहर

माझ्यामुळं कलम ३७० रद्द झालं: राखी सावंत

सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राखी सावंतनं नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत ती कलम ३७०बद्दल बोलताना दिसतेय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2019, 11:39 am

मुंबईः 'कलम ३७०चा मुद्दा सर्वात आधी आम्ही उचलला होता आणि आमचं ऐकल्याबद्दल मोदीजींचे आभार,' असं वक्तव्य करून ड्रामा क्वीन राखी सावंतनं पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राखी सावंतनं नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत ती कलम ३७०बद्दल बोलताना दिसतेय.

'मोदीजी धन्यवाद, काश्मीर आपलं झालं आहे. मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासारखं कोणी नाही. कलम ३७०वर आधारित चित्रपटात मला भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार. काश्मीर व कुलूमध्ये चित्रपटाचं पूर्ण चित्रीकरण झालं आहे. पण,सर्वात आधी आम्ही या मुद्द्याला हात घातला. माझं ऐकून तुम्ही ३७० रद्द केलं यासाठी मोदीजी धन्यवाद, माझं ऐकल्याबद्दल तुमचे आभार.' असा दावा व्हिडिओतून तिनं केलाय.
View this post on Instagram A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on Aug 6, 2019 at 2:54am PDT

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. अनेकांनी तिला या तिच्या या दाव्यावरून ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज