मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा यांची लेक 'आदिरा' हिचा आज पहिला वाढदिवस. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाबद्दल यापुर्वी मौन बाळगत मिडीयाला त्याची कानोकान खबर लागू दिली नव्हती. त्यानंतर आदिरालाही या दोघांनी मिडीया पासुन दूरच ठेवलं आहे. आता लाडक्या लेकीचा पहिलावहिला वाढदिवस असल्याने त्यांनी पहिल्यांदाच आदिराचा एक गोड फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यशराज फिल्मच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा फोटो व राणीने तिच्या लेकीसाठी लिहीलेलं पत्र शेअर केलं आहे.
"मी आदिरावर खूप प्रेम करते, मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. तिच्या जन्मानंतर माझं आयुष्य बदललं आहे. आईच्या भुमिकेत आल्यानंतर एका बाळाचं पालनपोषण करणं अतिशय कठीण काम आहे. कारण तुम्ही स्वत:साठी जगणं विसरून जाता आणि तुमच्या बाळासाठी जगण्यास सुरुवात करता. बाळाने तुम्हाला आईच्या रूपात नवा जन्म दिला आहे. मी रात्री झोपू शकत नाही. दिवसाही मी झोपू शकत नाही. मी त्या सर्व मातांबद्दल विचार करते, ज्यांना मुलं आहेत. माझ्यासोबत जे होतंय ते त्यांच्यासोबतही होत असेल का? मी सर्व मातांना सलाम करते. आदिराचा माझ्यापोटी जन्म झाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मला माहीत नाही, आयुष्याच्या या टप्प्यात कोणी मला समजून घेऊ शकतं की नाही. पण मी माझं आयुष्य जगत आहे. कोणत्याही भीतीशिवाय. शूरपणे, शिस्तीत आदिराला वाढवेन, अशी मला आशा आहे. सगळ्यांना तिचा अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा आहे. दुसरं कोणी नसेल तरीही मला तिचा कायम अभिमान असेल." अशा गोड शब्दात राणीने तिच्या लेकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.