अ‍ॅपशहर

रोहितच्या अॅक्शनपटात दिसणार रणवीर सिंग

'दे मार'पट बनिवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. पहिल्यांदाच तो रोहितच्या चित्रपटात दिसणार असल्यानं या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

Maharashtra Times 16 Oct 2017, 12:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranveer singh to work in an action movie with rohit shetty
रोहितच्या अॅक्शनपटात दिसणार रणवीर सिंग


'दे मार'पट बनिवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. पहिल्यांदाच तो रोहितच्या चित्रपटात दिसणार असल्यानं या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

पुढच्या वर्षी मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असं सांगितलं जातं. 'हा चित्रपट हाणामारीनं भरलेला असेल. त्यामुळं लोकांना खूप आवडेल,' असा विश्वास रोहितनं व्यक्त केलाय. रणवीर सिंगकडून अॅक्शन अभिनेत्याची भूमिका करून घेणं आव्हान असेल, असंही तो म्हणाला. रोहित शेट्टीची टीम सध्या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर शेवटचा हात फिरवतेय, असं समजतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज