अ‍ॅपशहर

सचिनच्या चित्रपटाला राज्यात कर माफी

मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेट देव अशी उपाधी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर असलेल्या 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाला मनोरंजन कर माफ करण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 7:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin_640x480_81492058186


मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेट देव अशी उपाधी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर असलेल्या 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाला मनोरंजन कर माफ करण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

बुधवारी, या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमियर पार पडला होता. तर, आजपासूनच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटाची उत्सुकता सचिनप्रेमींमध्ये असल्यामुळे चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. सचिनचे क्रिकेटजगतात असलेले योगदान, मेहनत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी चित्रपटाला मनोरंजन कर माफी देण्यात आली असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्याआधी केरळ, ओदिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये चित्रपटाला कर माफी देण्यात आली आहे.


दरम्यान, 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातही दाखवला जावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. सचिनची कारकिर्द भावी पिढीसाठी आदर्शवत असून हा चित्रपट प्रेरणा देणारा असल्याचे मनसेने म्हंटले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज