अ‍ॅपशहर

सचिनच्या भक्तांसाठी 'मस्ट वॉच' व्हिडिओ

'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरील चित्रपट - 'सचिनः ए बिलिअन ड्रीम्स' येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर पाहून सचिनचे भक्त 'क्लीन बोल्ड' झाले आहेत.

Maharashtra Times 10 May 2017, 9:48 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin tendulkar movie anthem out
सचिनच्या भक्तांसाठी 'मस्ट वॉच' व्हिडिओ


'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरील चित्रपट - 'सचिनः ए बिलिअन ड्रीम्स' येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर पाहून सचिनचे भक्त 'क्लीन बोल्ड' झाले आहेत. त्या ट्रेलरच्या शेवटी ऐकू येणारा 'सचिssन सचिन'चा हा मंत्र त्यांना भूतकाळात घेऊन गेलाय आणि त्या भक्तीरसात न्हाऊन निघण्यासाठी, आपल्या दैवताचं दर्शन ७० एमएम पडद्यावर घेण्यासाठी ते आतुर आहेत.

सचिनप्रेमींची ही उत्सुकता आणखी ताणली जावी, यादृष्टीने निर्मात्यांनी सिनेमातील एका गाण्याचा व्हिडिओ लाँच केलाय. 'सचिssन सचिन' असंच या गीताचं शीर्षक आहे. जादुगार संगीतकार ए आर रेहमानचं जबरदस्त संगीत, सुखविंदर सिंगचा पहाडी आवाज आणि सचिन तेंडुलकरचे मास्टर स्ट्रोक असा तिय्या त्यात जुळून आलाय. या व्हिडिओच्या प्रदर्शनावेळी सचिनही 'नॉस्टॅल्जिक' झाला होता. स्वाभाविकच, सचिनभक्तांसाठी हा व्हिडिओ 'मस्ट वॉच' आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज