अ‍ॅपशहर

सागरिकाची ‘किक’

अभिनेत्री सागरिका घाटगे बऱ्याच दिवसांनंतर मराठी सिनेमात चमकणार आहे. लवकरच तिचा 'मान्सून फुटबॉल' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या ती मैदानावर फुटबॉलचे धडे गिरवते आहे. या सिनेमात सागरिका एका फुटबॉल संघाचं नेतृत्व करताना दिसेल.

Maharashtra Times 21 Sep 2018, 10:18 am
मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sagrika-ghatge


अभिनेत्री सागरिका घाटगे बऱ्याच दिवसांनंतर मराठी सिनेमात चमकणार आहे. लवकरच तिचा 'मान्सून फुटबॉल' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या ती मैदानावर फुटबॉलचे धडे गिरवते आहे. या सिनेमात सागरिका एका फुटबॉल संघाचं नेतृत्व करताना दिसेल. काही गृहिणी एकत्र येऊन फुटबॉलचा एक संघ तयार करतात, अशी या सिनेमाची कथा असल्याचं समजतं. या सिनेमाचं शूटिंग येत्या वर्षात सुरू होणार असून, सागरिकानं या सिनेमाची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. याआधी 'चक दे इंडिया' या हॉकीवर आधारित हिंदी सिनेमात ती खेळाडू म्हणून दिसली होती. प्रीती सब्रवाल असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. सागरिकानं अभिनेता अतुल कुलकर्णीसोबत 'प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमात काम केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज