अ‍ॅपशहर

संजय दत्तने पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा

अभिनेता संजय दत्तने गंगा नदीघाटावर पिता सुनील दत्त आणि आई नर्गिस यांचा श्राद्धविधी करून आपल्या वडिलांची शेवटची इच्छा आज पूर्ण केली. संजय दत्त आपल्या आगामी 'भूमी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आला असून प्रमोशनआधी त्याने पिंडदानाचा विधी उरकला.

Maharashtra Times 13 Sep 2017, 8:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वाराणसी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay dutt fulfills father sunil dutt last wish in varanasi ghat
संजय दत्तने पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा

अभिनेता संजय दत्तने गंगा नदीघाटावर पिता सुनील दत्त आणि आई नर्गिस यांचा श्राद्धविधी करून आपल्या वडिलांची शेवटची इच्छा आज पूर्ण केली. संजय दत्त आपल्या आगामी 'भूमी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आला असून प्रमोशनआधी त्याने पिंडदानाचा विधी उरकला.

राणी घाटावर हा श्राद्धविधी करण्यात आला. सिद्धिविनायक मंदिराचे पुजारी राजेंद्र कुमार शर्मा यांच्यासह ८ पुजाऱ्यांनी श्राद्धाची क्रिया पूर्ण केली. रखरखीत उनात जवळपास अर्धा तास हा विधी चालला. 'भूमी' चित्रपटात संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री आदिती राव हैदरी तसेच अन्य स्टाफही यावेळी हजर होता.

पिंडदानानंतर संजय दत्त पत्रकारांशी बोलला. कारागृहातून सुटल्यानंतर माझं पिंडदान जरूर करशील, असे बाबांनी मला सांगितले होते. त्यामुळेच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज हा विधी पार पाडला, असे संजय म्हणाला. हा विधी उरकल्यानंतर संजयला काशी विश्वनाथ मंदिर आणि काळभैरव मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. मात्र चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने आयत्यावेळी कार्यक्रमात बदल करण्यात आला. तिथून संजय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट सनबीम शाळेत पोहोचला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज