अ‍ॅपशहर

कायमचं निर्भय दे...

बालदिनानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ‘मुंटा’च्या माध्यमातून छोट्या दोस्तांना दिलेली ही छानशी कवितेची भेट…

Maharashtra Times 14 Nov 2017, 4:14 am
आजच्या बालदिनानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं ‘मुंटा’च्या माध्यमातून छोट्या दोस्तांना दिलेली ही छानशी कवितेची भेट…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sankarshan karhade poem
कायमचं निर्भय दे...


'सेटल'च्या या भूतापासून, कायमचं निर्भय दे...

नाहीतर मला माझं माझं, ते बालपणीचं वय दे...

हो हो हे तेच वय, जेव्हा शक्तीमान लागायचं...

माझी झोप जेवण सगळं, आई-बाबांनी बघायचं...

एकदा मला लहान कर, त्या पेरुच्या झाडावर चढू दे...

अर्जुनाची गोष्ट ऐकत, आजोबांजवळ पडू दे...

लहान तर कर, मी वाढलेलं सगळं सगळं खाईन...

मित्राकडे जाईन अभ्यासाला, आणि अभ्यासच करुन येईन...

मला नव्हतं वाटलं देवा, तू असा खेळ करशील...

वाढत्या वयाच्या आकाराची, संकटंसुद्धा भरशील...

मोठं करतो तो आम्हाला, अन् खेळ पहात बसतो...

खरे 'सेटल' आपण आपल्या, लहानपणी असतो!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज