अ‍ॅपशहर

‘बाहुबली- द कन्क्लूजन’मध्ये शाहरूख खान?

कटाप्पाने बाहुबलीला का मारले ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. यात एक नवीन ट्विस्ट म्हणजे बाहुबली २ मध्ये शाहरूख खान दिसणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहे.‘बाहुबली २’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार नाही. मात्र त्याने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करावी, अशी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांची इच्छा आहे. शाहरुखने या चित्रपटात काम करावे म्हणून दिग्दर्शक एस एस राजमौलीसह अनेक जण प्रयत्न करत असल्याचे समजते.

Maharashtra Times 14 Feb 2017, 11:08 am

महाराष्ट्र टाइम्स.कॉम shah rukh who plays the character of a mediator between protagonist prabhas and villain rana daggubati
‘बाहुबली- द कन्क्लूजन’मध्ये शाहरूख खान?

‘बाहुबली’ चित्रपटाचे यश पाहता बाहुबली २ हा त्या पेक्षा जास्त भव्य आणि वरचढ असेल यात शंकाच नाही. चित्रपटाची टीम किंवा शाहरुख खानने बाहुबली २ मध्ये काम करण्याबाबत अधिकृत दुजोरा दिला नसला तरी,या चित्रपटातील शाहरुखच्या भूमिकेबद्दल चर्चा होत आहेत. तसेच शाहरूख खान चित्रपटात काम करण्यास तयार झाला तर बाहुबली आणि खलनायक भल्लाल देव/पल्लवाथेवान यांच्यातील मध्यस्थाची भूमिका करणार असल्याचे समजते.

बाहुबली २ मध्ये शाहरूख खानला पाहण्यासाठी चाहते किती उत्सुक आहेत हे या चर्चेवरून दिसून येत आहे. तसेच चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखने हिरवा कंदील दिला तर चित्रपटात एक नवा रंग येईल यात शंका नाही.गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर २८ एप्रिल रोजी बाहुबली-२ प्रदर्शित होणार असून या सिक्वेलच्या चित्रीकरणाला मागील वर्षापासूनच सुरुवात झाली आहे.

दिग्दर्शक राजामौली बाहुबली २ म्हणजेच ‘बाहुबली- द कन्क्लूजन' मध्ये काम करण्यासाठी शाहरुखचे मन वळवणार की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे .

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज