अ‍ॅपशहर

'हसीना पारकर'मधील आयटम साँग रिलीज

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित चित्रपट 'हसीना पारकर' हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आयटम साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 10:56 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुबंई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharaddha kapoor film haseena parkar item song releases
'हसीना पारकर'मधील आयटम साँग रिलीज


कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित चित्रपट 'हसीना पारकर' हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आयटम साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

अंडरवर्ल्डची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात अपेक्षेनुसार एका आयटम साँगचा समावेश करण्यात आला आहे. 'पिया आ' असे या गाण्याचे बोल असून सारा अंजुली ही त्यावर थिरकताना दिसणार आहे. सारा अंजुली या गाण्यातून बॅालिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.


'हसीना पारकर'चं दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केलं असून श्रद्धा कपूर ही हसीनाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सिद्धांत कपूर हा दाऊदची भूमिका साकारणार आहे. तर, अंकुर भाटिया हसीनाच्या पतीच्या भूमिकेत दिसेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज