अ‍ॅपशहर

योगा दिनानिमित्त शिल्पा शेट्टीने शिकवली योगासने

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने गुजरातमधील सुरत येथे रविवारी योगाचे धडे दिले. फिट अँड फाइन शिल्पा शेट्टीकडून या योग सभेत सुमारे तीन हजार लोकांनी योगासने शिकून घेतली. येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिल्पाने हे योग प्रशिक्षण दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2019, 7:18 pm
सुरत:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shilpa


अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने गुजरातमधील सुरत येथे रविवारी योगाचे धडे दिले. फिट अँड फाइन शिल्पा शेट्टीकडून या योग सभेत सुमारे तीन हजार लोकांनी योगासने शिकून घेतली. येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिल्पाने हे योग प्रशिक्षण दिले.

शिल्पाला तिच्या स्लीम ट्रीम फिगरमुळे फिटनेस आयकॉन म्हटले जाते. तिच्याकडून योग शिकायला मिळणं हा अनेकांसाठी जुळून आलेला भाग्याचा योगच होता. त्यामुळे व्यासपीठावर शिल्पा जशी आसने दाखवत होती, तशी पाहून ती आसने करताना लोकांचा उत्साह दि्वगुणित झाला होता.

'येथे येताना मी थोडी उत्साहित होते, मला वाटलं होतं, की थोडाबहुत प्रतिसाद तर मिळेलच. पण इथे आल्यावर एवढा मोठा प्रतिसाद पाहून मी तर हरखून गेले आहे,' अशा शब्दात शिल्पाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज