अ‍ॅपशहर

श्रद्धा कपूरचा महिन्याचा डबा 'फक्त दीड लाखांचा'!

खाऊन-पिऊन वजन कमी करायचं असेल तर?... तर त्याची किंमतही तेवढीच मोजावी लागते. अभिनेत्री श्रद्धा कपूरने महिन्याला लावलेल्या टिफिनची किंमत तब्बल दीड लाख रुपये आहे! तिने एका सेलिब्रिटी ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार डाएट सुरू केले आहे. आता ती दिवसातून २-४ नाही तर तब्बल ६ वेळा खाते.

Maharashtra Times 9 Dec 2016, 3:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shraddha kapoor goes for a 1 5 lakh tiffin
श्रद्धा कपूरचा महिन्याचा डबा 'फक्त दीड लाखांचा'!


खाऊन-पिऊन वजन कमी करायचं असेल तर?... तर त्याची किंमतही तेवढीच मोजावी लागते. अभिनेत्री श्रद्धा कपूरने महिन्याला लावलेल्या टिफिनची किंमत तब्बल दीड लाख रुपये आहे!

आधीच 'स्कीनी' असलेल्या श्रद्धा कपूरने आणखी वजन कमी करण्याचं ठरवलं आहे. मराठी-पंजाबी अशी मिश्र कुटुंबातली असलेल्या श्रद्धाच्या घरी दोन्ही संस्कृतीतल्या पदार्थांची रेलचेल असते. पण वजन घटवण्याच्या मोहापायी या घरच्या सुग्रास जेवणाचा मोह श्रद्धाने आवरला आहे.

तिने एका सेलिब्रिटी ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्यानुसार डाएट सुरू केले आहे. आता ती दिवसातून २-४ नाही तर तब्बल ६ वेळा खाते. ते अर्थात डाएट फूड असल्याने तिचे वजन नियंत्रित किंबहुना आणखी कमी व्हायला मदत होतेय. तिच्या या डाएट डब्यात प्रथिने, नट्स, बीन्स, सलाड अशा विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल असते. असे म्हणताहेत की श्रद्धालाही हा नवीन मेनू आवडतोय. अर्थात महिना दीड लाख रुपये मोजल्यावर पदार्थांना थोडी चव तर असणारच म्हणा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज