अ‍ॅपशहर

पूरग्रस्तांसाठी सरसावले मराठी कलाकार

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणांपासून, सामन्य नागरिकही मदतीला धावून आले. मराठी कलाकारही नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांनी मदतीसाठी आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 11:54 am
मुंबईः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी वेगानं वाढत असताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणांपासून, सामान्य नागरिकही मदतीला धावून आले. मराठी कलाकारही नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांनी मदतीसाठी आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subodh-bhave


उमेश कामत, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सुयश टिळक, प्रवीण तरडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी कोल्हापूरकरांना मदतीचा हात दिला आहे. 'ज्या कोल्हापूरकर, सांगलीकर रसिकांनी आम्हाला इतकी वर्ष सांभाळलं, प्रेम केलं ते संकटात असताना आम्हीही मागू राहू शकत नाही. मराठी नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमी तुमच्या मदतीला असतील.' असं ट्विट कलाकारांनी केलं आहे. तसंच, सामान्य नागरिकांनाही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.



अभिनेता सुबोध भावेनंही काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता 'अश्रुंची झाली फुले' नाटकाचे प्रयोग रद्द केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज