अ‍ॅपशहर

माणुसकी जपा!

'माणूस आहे पण माणुसकी कुठंय?' या एका वाक्यानं सनी लिओनिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिनं हे वाक्य कुठेतरी वाचलं होतं आणि ते कधी विसरणार नसल्याचं ती सांगते. याच कारणास्तव बॉलिवूडमधील सगळ्यात सक्रिय प्राणीप्रेमींमध्ये सनीचा पहिला नंबर लागतो. 'जे योग्य आहे ते केलं पाहिजे. माणुसकी जपायला हवी. आपणच प्राण्यांची मदत करू शकतो', असं ही बॉलिवूडची लैला म्हणते. मुक्या जनावरांवर तिचा जीव असतो.

Maharashtra Times 26 Dec 2016, 7:45 pm
मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sunny leone receives the peta person of the year award
माणुसकी जपा!

'माणूस आहे पण माणुसकी कुठंय?' या एका वाक्यानं सनी लिओनिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिनं हे वाक्य कुठेतरी वाचलं होतं आणि ते कधी विसरणार नसल्याचं ती सांगते. याच कारणास्तव बॉलिवूडमधील सगळ्यात सक्रिय प्राणीप्रेमींमध्ये सनीचा पहिला नंबर लागतो. 'जे योग्य आहे ते केलं पाहिजे. माणुसकी जपायला हवी. आपणच प्राण्यांची मदत करू शकतो', असं ही बॉलिवूडची लैला म्हणते. मुक्या जनावरांवर तिचा जीव असतो. त्यातही विशेषतः भटकी कुत्री आणि मांजर यांना मदत करण्यासाठी ही बोल्ड अभिनेत्री कायम पुढे असते. याच कारणास्तव अलीकडे सनीला पेटा पर्सन ऑफ द इयरच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
मध्यंतरी तिनं कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पेटाच्या एका जाहिरातीत काम केलं​ होतं. एकूणच या वर्षात तिनं कुत्र्यांच्या चांगल्यासाठी बऱ्यापैकी काम केलंय. द ऍनिमल होपचे मार्क चिंग आणि वेलनेस फाऊंडेशन यांची कामं बघून तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते. एक माणूस आणि सेलिब्रिटी म्हणून आता यापुढे कायम प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार असल्याचं ती नमूद करते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज