अ‍ॅपशहर

​'केबीसी-९' बिग बी ऐवजी अभिनेत्रीला संधी?

आपल्या भारदस्त आवाजाने 'कौन बनेगा करोडपती' अर्थात केबीसीचे ७ सीजन गाजवणारे बिग बी पुढील केबीसीमध्ये दिसणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायला अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून अमिताभ बच्चन यांच्याऐवजी अभिनेत्रीला संधी देण्याचा विचार केबीसीचे निर्माता करीत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा केबीसीसोबतचा करार संपला आहे.

Maharashtra Times 18 May 2017, 9:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh bachchan will not be hosting kbc a lady may be new host
​'केबीसी-९' बिग बी ऐवजी अभिनेत्रीला संधी?

आपल्या भारदस्त आवाजाने 'कौन बनेगा करोडपती' अर्थात केबीसीचे ७ सीजन गाजवणारे बिग बी पुढील केबीसीमध्ये दिसणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायला अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून अमिताभ बच्चन यांच्याऐवजी अभिनेत्रीला संधी देण्याचा विचार केबीसीचे निर्माता करीत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा केबीसीसोबतचा करार संपला आहे.

'कौन बनेगा करोडपती' या शोचे आतापर्यंत ८ सीजन संपले आहेत. या आठ सीजनमधील अभिनेता शाहरूख खानचा तिसरा सीजन वगळता उर्वरित सीजन अमिताभ बच्चन यांनी केले. त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला आहे. परंतु केबीसीचे निर्माते या शोचा पूर्ण फॉर्मेट बदलण्याचा विचार करीत आहे. ८ सीजनमध्ये पुरुषांनी होस्ट केल्याने यावेळेस एखाद्या महिलेने कार्यक्रम होस्ट करावा यासाठी चॅनलने चाचपणी सुरू केली आहे. यासाठी केबीसीच्या निर्मात्यांकडून आतापर्यंत माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याशी संपर्क केला असून त्यांना यासंबंधी विचारणा केल्याचे सांगितले जात आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा शो फॉर्मेट बदलल्यास आणि महिलेने या कार्यक्रमाचे होस्ट केल्यास हा कार्यक्रम एका नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास केबीसीच्या निर्मात्याला वाटत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही कार्यक्रमाचे होस्ट महिलेने केले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज