अ‍ॅपशहर

कपिल शर्मा शोमधून सिद्धू 'आउट'?

कॉमेडियन किंग कपिल शर्माच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपण्याची चिन्ह दिसत नाही. 'द कपिल शर्मा शो'मधील डॉ. मशहूर गुलाटी अर्थात सुनील ग्रोवरने कार्यक्रम सोडल्यापासून कार्यक्रमाला उतरती कळा लागलेली आहे. आता कपिलचा खास मित्र आणि या शोचे खास सदस्य नवज्योत सिंग सिद्धूही या कार्यक्रमातून गायब होऊ शकतात. सिद्धू यांच्याजागी अर्चना पूरण सिंहला आणले जाऊ शकते.

Maharashtra Times 17 Aug 2017, 12:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम archana pooran to replace navjot singh siddhu in the kapil sharma s
कपिल शर्मा शोमधून सिद्धू 'आउट'?


कॉमेडियन किंग कपिल शर्माच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपण्याची चिन्ह दिसत नाही. 'द कपिल शर्मा शो'मधील डॉ. मशहूर गुलाटी अर्थात सुनील ग्रोवरने कार्यक्रम सोडल्यापासून कार्यक्रमाला उतरती कळा लागलेली आहे. आता कपिलचा खास मित्र आणि या शोचे खास सदस्य नवज्योत सिंग सिद्धूही या कार्यक्रमातून गायब होऊ शकतात. सिद्धू यांच्याजागी अर्चना पूरण सिंहला आणले जाऊ शकते.

अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने यासंदर्भात स्वतः माहिती दिली आहे. सिद्धूंना आजारपणामुळे शूटिंग करणं कठीण होत आहे. सिद्धू यांच्या खुर्चीवर बसणं अवघड वाटतंय, तसेच आम्हा सर्वांना त्या खुर्चीवर सिद्धूंना पाहायची सवय झालेली आहे. परंतु कपिलने मला शूटिंगच्या दिवशी बोलावलं आणि मी माझ्या जुन्या मित्राला नाही म्हणू शकले नाही, असे अर्चना यांनी सांगितले. मी केवळ काही एपिसोडमध्ये दिसणार आहे. ज्यावेळी सिद्धू यांची प्रकृती ठीक होईल त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या खुर्चीवर बसतील, असं सांगायलाही अर्चना विसरल्या नाहीत. 'द कपिल शर्मा शो' सोनी चॅनेलवर प्रसारित होतोय तर कपिल आणि अर्चना यांनी याआधी 'कॉमेडी सर्कस'मध्ये एकत्र काम केले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू कपिलवर नाराज असल्याच्या बातम्या आधीच प्रसारित झाल्या आहेत. कपिलने अर्जुन रामपालसोबत प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या 'डॅडी' चित्रपटाची शूटिंग केली. तर त्या दिवशी सिद्धू एपिसोडला गैरहजर राहिले. प्रकृती ठीक नसल्याने सिद्धू शोमध्ये सहभागी झाले नव्हते. सिद्धूची प्रकृती ठीक नसल्याने कपिलनं त्याची खास मैत्रिण अर्चना पूरन सिंहला बोलावले. अर्चनाला बोलावल्याने सिद्धू नाराज झाल्याची चर्चा आहे. आजारपणानंतर सिद्धू कपिलच्या कार्यक्रमाला येणार का? किंवा अर्चना पूरन सिंहच्या उपस्थितीत कार्यक्रमाला कसा टीआरपी मिळतोय याकडं चॅनलचं लक्ष असणार हे नक्की.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज