अ‍ॅपशहर

म्हणून रणवीर-शाहिदला मागे टाकलं असावं...

'अजून एकही सिनेमा प्रदर्शित झाला नसतानाही माझं नाव यांच्या पुढे आल्याचा मला खूप आनंद झालाय. याचा अर्थ मी जी फॅशन करत आलोय ती लोकांना आवडत आहे', असं तो अभिमानानं सांगतो...

मृण्मयी नातू | Maharashtra Times 30 May 2017, 12:55 am
आशियातील सगळ्यात आकर्षक पुरुषांमध्ये टीव्ही स्टार बरून सोबतीनं चक्क रणवीर सिंग, शाहिद कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन्सना मागे टाकलंय. 'अजून एकही सिनेमा प्रदर्शित झाला नसतानाही माझं नाव यांच्या पुढे आल्याचा मला खूप आनंद झालाय. याचा अर्थ मी जी फॅशन करत आलोय ती लोकांना आवडत आहे', असं तो अभिमानानं सांगतो...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम barun sobti is happy being placed as asias sexiest man before shahid kapoor and ranveer singh
म्हणून रणवीर-शाहिदला मागे टाकलं असावं...


काही वर्षांपूर्वी अभिनेता बरून सोबतीनं मालिका सोडली म्हणून निर्मात्यांना थेट मालिकाच बंद करावी होती. इतकी त्याची लोकप्रियता होती किंबहुना आजही आहे. मधल्या काळात त्यानं सिनेमे, लघुपट, वेब सिरीज अशी विविध काम केली. तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेला हा टीव्ही स्टार आता परत एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
तो परत येतोय
'इस प्यार को क्या नाम दू' या नवीन मालिकेत परत एकदा बरून अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. 'स्टार प्लसची कामाची पद्धत आता बदलल्याचं जाणवत आहे. नवीन इमेज बनवण्यापेक्षा जी आहे त्यानुसार कथा गुंफली जात आहे' असं तो सांगतो. बरूननं साकारलेला अर्णव सिंग रायझादा आजही लोकांना आठवतो. आता मात्र तो अद्वय सिंग रायझादाच्या भूमिकेत दिसेल. या नवीन भूमिकेबद्दल तो खूप उत्सुक आहे.
कुटुंबीय महत्त्वाचे
लहानपणापासून समाजाची फारशी पर्वा केली नसल्याचं बरून सांगतो. 'मी माझ्या आई-बाबांना विचारतो. त्यांचं आणि आता माझ्या पत्नीचं मत माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच केला नाही' असं तो स्पष्ट सांगतो. कदाचित म्हणूनच करिअरच्या शिखरावर असताना त्यानं सिनेमासाठी अचानक मालिका सोडली
असावी.
सोशल मीडियाचा फॅन नाही
आज या टीव्ही स्टारचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. पण त्याला हे जग आवडत नाही. 'या डिजिटल जगात सोशल मीडियाची खूप शक्ती आहे. आणि ती सांभाळता येणं सोपं नाही. प्रत्येक शब्द लिहिताना विशेष काळजी घ्यावी लागते' असं तो सांगतो.
संमिश्र भावना
बॉलिवूडसाठी बरूननं मालिकेला रामराम केला होता. पण त्याचं काम फारसं दिसून आलं नाही. 'हो ना. आणि आता या वर्षातच माझे सिनेमे आणि मालिका सगळं काही एकत्र येणार आहे. त्यामुळे मनात आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना आहेत' अशी खंत तो व्यक्त करतो. 'तू है मेरा संडे', '२२ यर्ड्स', 'सतरा को शादी है' अशा आगामी अनेक रंजकपटांमध्ये त्याच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज