मुंबई टाइम्स टीम
'बिग बॉस' या कार्यक्रमात आता एलिमिनेशनचा खेळ खऱ्या अर्थानं सुरू झालाय. गेल्या आठवड्यात शार्दूल पंडित शोमधून बाहेर पडला. नॉमिनेशन राऊंडमध्ये त्याच्यासोबत रुबिना दिलैक ही स्पर्धक देखील होती. दोघांनाही सारखीच मतं मिळाली होती. पण तरी बिग बॉसनं शार्दूलला घरातून एलिमिनेट केलं. शोच्या मेकर्सच्या या निर्णयावर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य नाराज आहे.
बिग बॉसने प्रामाणिकपणे निर्णय घ्यावा, काही ठरावीक स्पर्धकांना पाठिंबा देऊ नये असं म्हणत तिनं बिग बॉसवर निशाणा साधला आहे. देवोलिना बिग बॉसच्या मागच्या सीझनमधली स्पर्धक आहे. तिला या शोचा अनुभव आहे. त्यामुळे तिने शार्दूलचं नाव घेत बिग बॉसवर भाष्य केलं.
पहिल्यांदा दिसला शिल्पा शेट्टीच्या मुलीचा चेहरा, सुंदर आहे समीशा
'रुबीना आणि शार्दूलला एकसमान मतं मिळाली होती. गेल्या सीझनमध्ये माझ्या आणि रश्मीच्या बाबतीत असं झालं होतं. बिग बॉस, असे निर्णय घेणं आता थांबवा. मला हे पटत नाहीय. खूप चांगला खेळ सुरू होता. बिग बॉसमधील खरी क्वीन मीच आहे. त्यामुळे या राणीला राग येईल असं काही करु नका.' अशा आशयाचं ट्विट तिनं केलंय. तिचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली...विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत