मुंबई:
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनमध्ये शोची जितकी चर्चा झाली तितकेच कौतुक झाले ते 'बिग बॉस'च्या सेटचे. 'बिग बॉस'चे हे सुंदर घर लोणावळ्यात बनवण्यात आले होते आणि कार्यक्रमाचे चित्रीकरणही तिथेच करण्यात आले. मात्र, काही दिवसात सुरू होणाऱ्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनचे चित्रीकरण मात्र मुंबईत होणार अशी चर्चा आहे.
हिंदीतील 'बिग बॉस'प्रमाणे मराठी 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. सगळे कलाकारही तिथेच राहात होते. मात्र आता चित्रीकरणाची जागा बदलण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस'चा सेट उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआधी मल्याळम 'बिग बॉस'चे चित्रीकरण फिल्म सिटीमध्ये झाले होते. मुंबईत चित्रीकरण करणे शोच्या दृष्टीनं सोयीचं पडणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.