अ‍ॅपशहर

डरना मना है!

‘बनमस्का’फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेनं गेल्या आठवड्यात बॉडी शेमिंगविरुद्ध आवाज उठवला होता. याच मुद्द्यावर तिनं म्हणणं खास मटाशी शेअर केलं…

Maharashtra Times 17 Mar 2017, 2:23 am
‘बनमस्का’फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेनं गेल्या आठवड्यात बॉडी शेमिंगविरुद्ध आवाज उठवला होता. याच मुद्द्यावर तिनं म्हणणं खास मटाशी शेअर केलं…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम body shaming
डरना मना है!


हाय फ्रेंड्स,

अभिनयक्षेत्रात असल्यानं चाहत्यांसोबत कनेक्ट राहावा यासाठी मी माझी सोशल मीडिया अकाऊंट्स प्रायव्हेट ठेवली नाहीत. मात्र फॉलो करू देतोय याचा अर्थ काहीही चालेल असं अजिबात होत नाही. आज प्रत्येकाला कमेंट करायची सवय आहे. त्यामुळे ‘काळी वर्तुळं कमी कर’, ‘बारीक हो’, ‘पोट झाक’ या आणि अशा अनेक गोष्टी माझ्याबद्दलही लिहिल्या गेल्या आहेत. पण आता बास झालं.

बॉडी शेमिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिवसातून मी १० मिनिटं जरी सोशल मीडियावर सर्फिंग केलं तरी त्यात अनेक चित्रविचित्र लेख आणि त्यावर कमेंट्स वाचायला मिळतात. उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली आफ्रिकेतल्या एका मुलाचा फोटो ट्रेंड होतोय. काय म्हणून? तर जगातील सगळ्यात डार्केस्ट बॉय. कुठलाही विचार न करता असं काहीतरी टाकणं किती चुकीचं आहे. असले प्रकार आजकाल फार कॅज्युअली घेतले जातात. मात्र मी याला अजिबात पाठिंबा देणार नाहीय. म्हणूनच महिला दिनाच्या दिवशी मी 'शेव्ह युअर ओपिनियन' हा हॅशटॅग वापरत इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला. एकप्रकारे त्यातून मी बॉडी शेमिंगविरुद्ध माझी भूमिका मांडली. अर्थात त्यावरही आक्षेपार्ह कमेंट्स आल्या. पण मी त्या डिलीट केल्या नाहीत.

या सगळ्यात जेव्हा मित्र साथ देतात तेव्हा अधिक छान वाटतं. त्यांनीच याला सामोरं जाण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. आपण बरोबर असताना समोरच्याला घाबरायचं कशाला? बऱ्याचदा असं होतं की आपल्या फोटोखाली अश्लील कमेंट्स नको म्हणून आपण त्या डिलीट करतो. विशेषतः मुलींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. मात्र त्या कमेंटमधून त्या लिहिणाऱ्याची विकृत मानसिकता दिसते. एखादी कमेंट काढल्यानं हा प्रकार थांबणाऱ्यातला नाही. आपण सगळ्यांनी मिळून त्याला धैर्यानं तोंड द्यायचं आहे.

आता सगळ्यात जमेची बाजू अशी की हल्ली इंस्टाग्राम, फेसबुकवर तीन जणांनी त्या अश्लील कमेंट करणाऱ्याला रिपोर्ट केलं तर ते अकाऊंट ब्लॉक करून डिलीट करण्यात येतं. सायबर सुरक्षेचं महत्त्वं वाढलंय. त्यामुळे कुणालाही घाबरायचं कारण नाही.

शिवानी रांगोळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज