अ‍ॅपशहर

नोटांमुळे ‘ट्रॅक्स’ही फिरले!

नोटा रद्द झाल्याने उडालेल्या गोंधळाचं प्रतिबिंब टीव्ही मालिकांमध्येही दिसून आलं. अनेक मालिकांच्या क्रिएटीव्ह टीम्सनी तर अक्षरशः काही तासांतच संपूर्ण मालिकांचे ट्रॅक्स बदलून टाकले…

Maharashtra Times 5 Dec 2016, 2:15 am
Mrinmayi.Natu@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demonitization of currency
नोटांमुळे ‘ट्रॅक्स’ही फिरले!

Tweet : @MrinmayiMT

नोटा रद्द झाल्याने उडालेल्या गोंधळाचं प्रतिबिंब टीव्ही मालिकांमध्येही दिसून आलं. अनेक मालिकांच्या क्रिएटीव्ह टीम्सनी तर अक्षरशः काही तासांतच संपूर्ण मालिकांचे ट्रॅक्स बदलून टाकले…

नोटा रद्द झाल्याने उडालेल्या गोंधळाचं प्रतिबिंब टीव्ही मालिकांमध्येही दिसून आलं. अनेक मालिकांच्या क्रिएटीव्ह टीम्सनी तर अक्षरशः काही तासांतच संपूर्ण मालिकांचे ट्रॅक्स बदलून टाकले…
पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. त्याचं प्रतिबिंब सध्या बऱ्याच हिंदी-मराठी टीव्ही मालिकांमध्येही दिसून येतंय. या ताज्या घटनांचं प्रतिबिंब टीव्ही मालिकांमध्ये उमटावं यासाठी लेखकांच्या कल्पकतेचा कस लागला. अचानक जाहीर झालेल्या या नोटाबंदीनंतर डेलीसोपच्या लेखकांनी त्यांच्या कथानकात बदल केले. गेले काही दिवस प्रेक्षकांना ते कथानकांतून पाहायला मिळतायत.

अनेक प्रसिद्ध मालिकांच्या क्रिएटिव्ह टीम्सनी तर काही तासांत संपूर्ण मालिकांचे ट्रॅक बदलले. या सगळ्यात त्यांची तारांबळ उडाली. नोटाबंदीमुळे मुंबईतल्या गुन्हेगारीचा टक्का घसरल्याचा वापर 'संयुक्त' मालिकेत शिताफीने करण्यात आला. 'योग्य वेळेत सगळं जुळवून आणताना धावपळ झाली खरी. कथा लिहिताना गुन्हेगारांसह सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून असा दुहेरी विचार करायचा होता. काही चुकीची माहिती जात नाहीय ना यासाठी नीट रिसर्च केलं. बातम्या वाचल्या, बँकअधिकाऱ्यांसोबत फोनाफोनी केली, चार चौघांशी बोलले आणि मग कुठे मी पुढचा ट्रॅक लिहिला' असे 'संयुक्त'च्या लेखिका रेश्मा खान यांनी सांगितलं.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्येही हे बदल दिसले. यामुळे त्यांनी अगोदर करून ठेवलेलं काही काम वाया गेलं आणि बँकमध्ये असलेल्या एपिसोड्स झटपट बदल करावे लागले. मालिकेचे निर्माते-लेखक असित मोदी सांगतात, 'हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे याचा कथानकात समावेश करणं मला गरजेचं वाटलं. निर्णय जाहीर झाला तेव्हा मी अहमदाबादला मूळ तारक मेहता यांच्याकडे होतो. त्यामुळे मी तिथूनच थेट लेखक निरेन भट्ट आणि क्रिएटिव्ह टीमशी संवाद साधला. एपिसोड काढण्यासाठी सगळ्या टीमने अक्षरशः दिवस-रात्र एक केले.'

या निर्णयानंतर कुणावर काय परिणाम होईल यावरुन अनेक विनोद सोशल नेटवर्किंग आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले होते. यामध्ये 'काहे दिया परदेस'मधील निशाकडे असलेल्या ७० लाखांवरुनही अनेक विनोद वाचायला मिळत होते. त्यानुसार पैसे ठेवलेल्या निशाचं बिंग शिव आणि आजीने फोडलं. खरं तर मूळ ट्रॅक वेगळाच होता. 'टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काळा पैसे गुंतलेला नसल्याने आम्हाला फारसा त्रास झाला नाही. जिथे इतर सेटवरील लोक आपापले पैसे कसे काढायचे याबाबत विचार करत होते तेव्हा आमची क्रिएटिव्ह टीम या निर्णयाकडे आव्हान म्हणून बघत होतो. स्वतःचे पैसे काढण्याऐवजी आम्ही कथानक फिरवण्याला जास्त वेळ दिला' अशी माहिती ‘काहे दिया…’चे निर्माता जितेंद्र गुप्ता यांनी दिली. नोटाबंदी झाल्यानंतर पैसे जपून वापरावेत, या निर्णयामुळे गोंधळून जाऊ नये असे संदेश कलाकारांकडूनही दिले जात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज