अ‍ॅपशहर

जब्बारशी जबरा नातं

जब्बारशी त्याचं अनोखं नातं जुळलं होतं. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्याला घास भरवताना खंडेरायाच्या, म्हणजेच देवदत्तच्या डोळ्यांतही पाणी आलं. हा जब्बार म्हणजे ‘जय मल्हार’मध्ये दिसणारा एक घोडा. तीन वर्ष चाललेल्या या मालिकेच्या सेटवर मुक्या प्राण्यांशी निर्माण झालेले अनोखे बंध, त्यांच्या आठवणी त्यांनी मुंटाला सांगितल्या…

Maharashtra Times 24 Apr 2017, 10:50 am
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jai malhar marathi serial
जब्बारशी जबरा नातं

जब्बारशी त्याचं अनोखं नातं जुळलं होतं. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्याला घास भरवताना खंडेरायाच्या, म्हणजेच देवदत्तच्या डोळ्यांतही पाणी आलं. हा जब्बार म्हणजे ‘जय मल्हार’मध्ये दिसणारा एक घोडा. तीन वर्ष चाललेल्या या मालिकेच्या सेटवर मुक्या प्राण्यांशी निर्माण झालेले अनोखे बंध, त्यांच्या आठवणी त्यांनी मुंटाला सांगितल्या…

जब्बारशी त्याचं अनोखं नातं जुळलं होतं. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्याला घास भरवताना खंडेरायाच्या, म्हणजेच देवदत्तच्या डोळ्यांतही पाणी आलं. हा जब्बार म्हणजे ‘जय मल्हार’मध्ये दिसणारा एक घोडा. तीन वर्ष चाललेल्या या मालिकेच्या सेटवर मुक्या प्राण्यांशी निर्माण झालेले अनोखे बंध, त्यांच्या आठवणी त्यांनी मुंटाला सांगितल्या…

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या खंडेरायावर आधारित ‘जय मल्हार’ ही मालिका ३० एप्रिलला बंद होतेय. या दिवशी मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळेल. शूटिंगसाठी वापरण्यात आलेले घोडे असो, कलाकारांच्या पायात घोटाळणारी मांजर असो, त्यांच्याशी या कलाकारांचे अनोखे बंध निर्माण झाले होते.

खंडेरायांची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागेला सुरुवातीपासून घोडेस्वारीची खूप आवड आहे. याचा फायदा त्याला या मालिकेतही झाला. मालिकेत शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या घोड्यांशी देवदत्तचे छान बंध जुळले होते. सारंगा, जब्बार, बॅनर, लक्ष्मी अशा चार घोड्यांना घेऊन मालिकेचं शूटिंग सुरू असायचं. देवदत्त त्यांची काळजी घ्यायचा. खंडेरायांचं वाहन म्हणून जब्बार दिसायचा. त्यामुळे त्याच्याशी तर देवदत्तचं एक वेगळंच नातं निर्माण झालं होत. त्याचंही देवदत्तवर खूप प्रेम असल्याचं दिसून यायचं. जब्बार सतत देवदत्तच्या मागे असायचा. त्यामुळे देवदत्त चालत असताना त्याचा तो आवडता घोडा त्याच्या मागे-मागे फिरायचा. जब्बारने यापूर्वी ‘मिर्झिया’ हा सिनेमा, ‘चंद्रनंदिनी’, ‘अकबर-बिरबल’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘पद्मावती’ या आगामी सिनेमातही तो दिसणार आहे.

जब्बारसोबत शेवटच्या द्श्याचं चित्रीकरण सुरू असताना तो चटकन शॉट देत नव्हता. देवदत्तची त्याला इतकी सवय झाली होती की, तो दूर गेला की जब्बारही शॉट सोडून त्याच्या मागे-मागे जात होता. या शॉट दरम्यान, ‘आज मी तुला शेवटचा घास भरवणार आहे. यानंतर मी इथे नसणार’ असं जब्बारला उद्देशून खंडेरायांचं वाक्य म्हणताना मलाही भरून आलं होतं असं देवदत्तनं सांगितलं. आता पुन्हा देव म्हणून या घोड्यांवर बसणं होणार नाही. या प्राण्यांचा सहवास पुन्हा मिळणार नाही याचं वाईट वाटतं असल्याचं देवदत्तनं सांगितलं.

मांजरीशी जुळली गट्टी

मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर एका मांजरीची अभिनेत्री ईशा केसकर, म्हणजेच बानूशी चांगलीच गट्टी जमली होती. ही मांजर मेकअपरुममध्ये, बाहेर कायम कलाकारांच्या अवतीभवती घोटाळत असायची. जेवणाच्या वेळीही ती त्यांच्यासोबत राहायची. फावला वेळ आणि कामाची शीण हलका करण्यासाठी कलाकार तिच्याबरोबर खेळायचे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज