अ‍ॅपशहर

'लग्नाची बेडी' फेम राघवने केला विनातिकीट प्रवास; टीसीने पकडल्यावर झाली फक्त २२ रुपयात सुटका

Sanket Pathak Aka Raghav छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक याने एका मुलाखतीत त्याचा विना तिकीट प्रवास केलेल्याचा किस्सा शेअर केला आहे. तेव्हा त्याला दंडही भरावा लागला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 8:50 am
मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका 'लग्नाची बेडी' प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. त्यातील राघव रत्नपारखी ही भूमिका साकारणारा अभिनेता संकेत पाठकदेखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याने आपल्या अभिनय आणि लूक्सच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यापूर्वी 'दुहेरी', 'छत्रीवाली', 'दोस्तगिरी' अशा मालिका आणि चित्रपटातून संकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरुणींमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आठवणीतील एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे जेव्हा त्याने विना तिकीट प्रवास केला होता आणि त्याच दिवशी त्याला टीसीने पकडलं होतं. परंतु, केवळ २२ रुपयात त्याची सुटका झाली होती. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊया.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanket pathak


नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या मुलखतीत संकेत म्हणाला, 'एकदा मी डहाणूहून मुंबईला येत होतो. त्यावेळी समोर एक्सप्रेस होती. मी धावतच जाऊन गुजरात एक्सप्रेस पकडली. तेव्हा मी थर्ड टायर एसीमध्ये चढलो. पण त्यावेळी माझ्याकडे लोकलचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. नेमकं मला तेव्हा टीसीने पकडलं. त्याने तिकीट मागितलं आणि मी त्याला मोठ्या ऐटीत लोकलचं तिकीट दाखवलं. पण मला तोपर्यंत हे ध्यानातच आलं नव्हतं की आपण तर एक्सप्रेसमध्ये आहोत. मला चूक कळताच मी अगदी गरीब मुलासारखा चेहरा केला जणू मला काही समजतच नव्हतं. टीसी म्हणाला हे तिकीट तर लोकलचं आहे. मी म्हणालो की मला हेच तिकीट दिलं आणि या गाडीत चालेल असं सांगितलंय. त्याचा बहुतेक माझ्यावर विश्वास बसलाच नाही. त्याने माझ्याकडे फाइन मागितला.'

View this post on Instagram A post shared by Thesanket Thepathak (@thesanketthepathak)

पुढे संकेत म्हणाला, 'मी गुपचूप माझं पाकीट काढलं. पाहिलं तर त्यात फक्त २२ रुपये होते. महत्वाचं म्हणजे त्या टीसीने माझ्याकडून २२ रुपये घेतले आणि मला सोडलं. तेव्हा नशीब चांगलं म्हणून त्याने मला सोडलं नाहीतर...' संकेतसोबत घडलेली घटना अनेकांसोबत घडतेच मात्र टीसीने २२ रुपयात तुम्हाला सोडलं तर ते तुमचं भाग्यच म्हणावं लागेल.
ठरलं तर मग: रात्री नेमकं काय घडलं? अर्जुनला त्या अवस्थेत पाहून सायलीचा होणार गैरसमज

महत्वाचे लेख