मुंबई टाइम्स टीम
टेलिवूड अर्थात छोट्या पडद्यावरचं लोकप्रिय जोडपं जय भानुशाली आणि माही वीज हेदेखील गेले काही महिने सतत काम करताय. त्यामुळे त्यांना ब्रेक घेणं गरजेचं होतं.
सिनेमा असो किंवा मालिका, सतत शूटिंग केल्यानंतर कलाकारांना छोट्या का होईना, पण एका ब्रेकची आवश्यकता असते. काम करून आलेला थकवा घालवण्यासाठी मग परदेशी फिरायला जाण्याचा विचार होऊ लागतो. आठ-दहा दिवस सुट्टी घेऊन आल्यावर नव्या जोमाने कलाकार कामाला सुरूवात करतात. टेलिवूड अर्थात छोट्या पडद्यावरचं लोकप्रिय जोडपं जय भानुशाली आणि माही वीज हेदेखील गेले काही महिने सतत काम करताय. त्यामुळे त्यांना ब्रेक घेणं गरजेचं होतं. यासाठी कुठेही परदेशात जाण्यापेक्षा त्यांनी भारतातच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
माही आणि जय दोघांनी केरळची निवड केली आणि ते आठवडाभरासाठी केरळला गेले. तिथे दोघं निसर्गाच्या सानिध्यात राहून रिलॅक्स होणार असल्याचं समजतं. कलाकार फिरायला गेले आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटो आले नाहीत तरच नवल. त्याप्रमाणे जय आणि माहीनेही आपले काही फोटो सोशल मीडियावर लगेच शेअर केले आहेत. यात माहीने निळ्या रंगाची, फुलांचे डिझाईन असलेली बिकिनी घातली आहे. छोट्या पडद्यावर सात्विक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अशाप्रकारे हॉट फोटो अपलोड करणं तिच्या चाहत्यांना आवडलं नसलं तरी तिचा तो बिनधास्त लुक मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या केरळ ट्रिपचे आणखी काही फोटो लवकरच पोस्ट करणार असल्याचं जयने सांगितलं.