अ‍ॅपशहर

ट्रेनमध्ये लिपस्टिक, नेलपेंट विकायची मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री

Vishakha Subhedar in Bus Bai Bus: 'बस बाई बस' या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनेता सुबोध भावे पुन्हा टीव्हीविश्वाकडं वळला आहे. आज महिला सर्वच क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावताना दिसताहेत. अशाच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला या कार्यक्रमात सहभागी होताहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2022, 4:04 pm
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या चर्चेत आहे. 'फू बाई फू', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशा अनेक विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विशाखानं नुकतीच एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Marathi Comedy Actress Vishakha Subhedar


काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेला बस बाई बस हा सेलिब्रिटींच्या गप्पांचा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे.विविध क्षेत्रातील यशस्वी महिला या शोमध्ये दिलखुलास गप्पा मारताना दिसतात.अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. राजकीय, तसंच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज महिलांनी या शोमध्ये हजेरी लावल्याचं दिसून आलं. विशाखानं देखील या शोमध्ये अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. इंडस्ट्री, संघर्ष आणि तिचं खासगी आयुष्याबद्दल तिनं दिलखुलास गप्पा मारल्या.

विशाखानं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. मुंबई लोकलचा प्रवास याबद्दल तिनं अनेक आठवणी सांगितल्या.
अखेर अजय-अतुलपर्यंत पोहोचला त्याचा आवाज! 'चंद्रा'मुळे Viral झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप
काय म्हणाली विशाखा?
सिनेसृष्टीत करिअरला सुरुवात व्हायच्या आधी मी शाळेत शिक्षिका होते. त्यासोबतच आकाशवाणीलाही काम करत होते. शाळा सुटल्यानंतर लोकल पकड्याची आणि सीएसटीला जायचे. उल्हासनगरवरून होलसेलमध्ये मी ड्रेस मटेरिअल वगैरे घ्यायचे आणि या ट्रेनमध्ये प्रवासादादरम्यान विकायचे. लिपस्टिक, नेलपेंट अशा वस्तूही होलसेल भावाक घेऊन मी लोकल आणि आकाशवाणीमधील महिलांना विकायचे. त्यामुळं आयुष्यातला लोकलप्रवास हा अविस्मरणीय आहे, असं विशाखानं सांगितलं.
Video : उर्मिला कोठारेचं मालिकेत पुनरागमन,'तुझेच मी गीत..'चं शूटिंग मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात
कधीही भीती वाटली नाहीलोकलचा प्रवास आयुष्यातला कधीही न विसरता येणारा भाग आहे. ट्रेनमध्ये वेफर्स, नेलपेंट विकणाऱ्या महिलांसोबत इतकी मैत्री झाली होती की, त्या नावानंही ओळखायच्या. नाटकाच्या शेवटच्या प्रयोगानंतर शेवटची लोकल पकडून मी घरी जायचे. या प्रवासादरम्यान तृतीयपंथियांची साथ मिळायची, पण त्यांची कधीही भीती वाटली नाही, असं म्हणत विशाखानं अनेक किस्से शेअर केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज