अ‍ॅपशहर

मराठी करोडपती तिसऱ्यांदा

'कोण होईल मराठी करोडपती?' या खास मराठी स्टाइलमध्ये आलेल्या गेम शोलाही तितकीच लोकप्रियता मिळाली. या शोच्या यशस्वी दोन सीझननंतर आता या शोचा तिसरा सीझन लवकरच कलर्स मराठीवर येण्यासाठी सज्ज झालाआहे.

Maharashtra Times 25 Jun 2016, 12:50 am
Rutuja.joshi@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi crorepati third season
मराठी करोडपती तिसऱ्यांदा


'कोण होईल मराठी करोडपती?' या खास मराठी स्टाइलमध्ये आलेल्या गेम शोलाही तितकीच लोकप्रियता मिळाली. या शोच्या यशस्वी दोन सीझननंतर आता या शोचा तिसरा सीझन लवकरच कलर्स मराठीवर येण्यासाठी सज्ज झालाआहे.

‘कौन बनेगा करोडपती’नं टीव्हीच्या प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातल्या सूत्रसंचालनाने या शोमध्ये जान ओतली. त्यानंतर हा शो मराठीतही आला. 'कोण होईल मराठी करोडपती?' या खास मराठी स्टाइलमध्ये आलेल्या गेम शोलाही तितकीच लोकप्रियता मिळाली. या शोच्या यशस्वी दोन सीझननंतर आता या शोचा तिसरा सीझन लवकरच कलर्स मराठीवर येण्यासाठी सज्ज झालाआहे. पहिल्या दोन सीझनपेक्षा हा आगामी सीझन पूर्णपणे वेगळा आणि अधिक मोठा असल्याचं समजतं. 'कोण होईल मराठी करोडपती?'च्या तिसऱ्या सीझनमध्ये बक्षीसाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. शिवाय या सीझनमध्ये निवेदनाची जबाबदारी कोणावर असेल हे अजून गुलदस्त्यातच आहे. यापूर्वी दोन सीझन होस्ट करणारे सचिन खेडेकर आताही नवा सीझनचं निवेदन करणार का हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी होस्ट बदलणार असल्याचं कळतं. याबद्दल बोलताना कलर्स मराठीचे प्रमुख अनुज पोद्दार सांगतात की, 'या कार्यक्रमाचे दोन सीझन चांगलेच हिट झाले होते. आता लवकरच आम्ही तिसरा सीझन घेऊन येतो आहोत हे खरं आहे. हा सीझन आधीच्या दोन्ही सीझनपेक्षा वेगळा आणि भव्य असेल. पण त्याबद्दल आत्ताच काही स्पष्ट सांगता येणार नाही. त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागेल.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज