अ‍ॅपशहर

नच बलिए सीझन-८: दिव्यांका-विवेकची जोडी विजेती!

'ये हे मोहब्बतें' मालिकेतील कलाकार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या टीव्ही स्टार जोडीने सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए सीझन- ८' चा किताब जिंकला आहे. ग्रॅण्ड फिनालेमध्ये सनाया ईराणी- मोहित सहेगल आणि अबिगैल पांडे-सनम जौहर या जोडींना मागे टाकत दिव्यांका-विवेक ही जोडी विजेती ठरली आहे.

Maharashtra Times 26 Jun 2017, 10:57 am
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nach baliye 8 winner divyanka tripathi and vivek dahiya own trophy
नच बलिए सीझन-८: दिव्यांका-विवेकची जोडी विजेती!

'ये हे मोहब्बतें' मालिकेतील कलाकार दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या टीव्ही स्टार जोडीने सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए सीझन- ८' चा किताब जिंकला आहे. ग्रॅण्ड फिनालेमध्ये सनाया ईराणी- मोहित सहेगल आणि अबिगैल पांडे-सनम जौहर या जोडींना मागे टाकत दिव्यांका-विवेक ही जोडी विजेती ठरली आहे.

नच बलिए ट्रॉफी व्यतिरिक्त या विजेत्या जोडीला ३५ लाख रुपये, एक हिरो मॅस्ट्रो स्कूटर आणि ऑरा ज्वेलरी बक्षीस म्हणून दिले गेले. टीव्ही कलाकार दिव्यांका त्रिपाठीला प्रेक्षक प्रथमच डान्सच्या मंचावर पाहत होते, पण तिने आपल्या चाहत्यांना अभिनयाप्रमाणेच या मंचावरूनही निराश केलं नाही. दिव्यांका- विवेकची नृत्यातील केमिस्ट्री अफलातून होती. जेव्हा नच बलिएचा आठवे सीझन सुरू झाले तेव्हा सर्वसाधारण परफॉर्मन्स देणारी ही जोडी ग्रॅण्ड फिनालेपर्यंत पोहोचेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र प्रत्येक एपिसोडगणिक यांचा परफॉर्मन्स इतका दमदार होऊ लागला की अखेर 'नच बलिए'च्या किताब त्यांनी आपल्या नावे केला.

या रिअॅलिटी शोपूर्वीच दिव्यांकाला तिच्या टीव्ही मालिकेतील अभिनयाने लोकप्रियता मिळालेली असल्याने या स्पर्धेत मेहनतीने दिलेल्या परफॉर्मन्सेस सोबतच तिला तिच्या स्टारडमचाही फायदा झाला. एप्रिलमध्ये हे आठवे सीझन सुरू झाले होते. १० सेलिब्रिटी जोडींनी यात भाग घेतला होता. आणि सर्वच जोडींनी आपापल्या परिने उत्तम नृत्य सादर करून प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज