अ‍ॅपशहर

'तारक मेहता का उल्टा चश्मा' बंद होणार?

गोकुळधाममधील जेठालाल आणि दया, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, ‘दुनिया हिला दुंगा’ म्हणणारा पत्रकार पोपटलाल, पापड अचार क्वीन माधवी... अशा एकापेक्षा एक पात्रांच्या माध्यमातून गेली नऊ वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सध्या वादात सापडली आहे.

Maharashtra Times 20 Sep 2017, 2:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sikh community demands ban on tv serial taarak mehta ka ooltah chashmah
'तारक मेहता का उल्टा चश्मा' बंद होणार?


गोकुळधाममधील जेठालाल आणि दया, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, ‘दुनिया हिला दूँगा’ म्हणणारा पत्रकार पोपटलाल, पापड अचार क्वीन माधवी... अशा एकापेक्षा एक पात्रांच्या माध्यमातून गेली नऊ वर्षे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सध्या वादात सापडली आहे. शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात मालिकेतील एका कलाकारानं शीख समाजाचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंद सिंग यांची भूमिका साकारली होती. शीख धर्मीयांनी यास आक्षेप घेतला आहे. 'या मालिकेत गुरू गोविंदसिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रिकरण असून असं करणं 'शीख सिद्धांता'च्या विरोधात आहे. कोणताही अभिनेता वा व्यक्ती गुरू गोविंदसिंग यांची बरोबरी करू शकत नाही. हा गुन्हा आहे. यामुळं आमच्या भावना दुखाल्या गेल्या आहेत,' असं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समीतीचे (एसपीजीसी) प्रमुख कृपाल सिंह बांदुगर यांनी सांगितलं. हा भाग टीव्हीवर प्रसारित करू नये, असं आवाहन बांदुगर यांनी दिग्दर्शक व निर्मात्यांना केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या मागणीमुळं 'पहारेदार पिया की' ही मालिका बंद करण्यात आली होती. त्यामुळं 'तारक मेहता का उल्टा चश्मा'वर करण्यात आलेल्या बंदीच्या मागणीवर काय निर्णय होतो, याकडं मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज