अ‍ॅपशहर

गेली लेखिका कुणामुळे?

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीत सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीपासून या मालिकेसाठी लेखन करणाऱ्या लेखिका रोहिणी निनावे यांनी या मालिकेला अचानक रामराम ठोकला आहे.

Maharashtra Times 22 Jan 2019, 9:21 am
कल्पेशराज कुबल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohini-ninave


लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीत सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीपासून या मालिकेसाठी लेखन करणाऱ्या लेखिका रोहिणी निनावे यांनी या मालिकेला अचानक रामराम ठोकला आहे. लेखिका म्हणून आपल्याला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नसल्यानं मालिका सोडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर निनावे यांना मालिका सोडायची होती, त्यामुळे त्यांनी ती सोडली असावी, असा चॅनेलचा दावा आहे.

रोहिणी निनावे यांनी मालिकेसाठी लेखन करत असताना त्यात अभिनयही केला होता. मालिकेतली गॅरी, शनाया, राधिका, केड्या ही सगळी पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत. मालिका एका वेगळ्या वळणावर असताना लेखिका रोहिणी निनावे यांनी अचानक एग्झिट घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बार्क रेटिंगमध्ये मालिका पुढे असताना लेखनात बदल का झाला? अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मालिकेशी संबंधित सूत्रांकडून असं समजलं की, 'मालिकेच्या कथानकाबाबत आपल्याला हवे तसे निर्णय घ्यायला मिळावेत असा लेखिकेचा कायम सूर असायचा. जे मालिकेच्या टीमला खटकलं. यातूनच त्यांच्यात खटके उडाले'. त्यांच्या एग्झिटनंतर अशा या लेखक आणि मालिकावले यांच्या चकमकीत प्रेक्षकांना येत्या काळात नव्या लेखकाच्या लेखणीतून मालिकेत काय दिसेल, हे पाहणं औत्सुक्याच आहे.

स्वातंत्र्य मिळत नव्हतं
मालिकेच्या कथानकाचा विस्तार करताना एक लेखिका म्हणून मला स्वातंत्र्य मिळत नव्हतं. इतकी वर्षे मालिकेसाठी काम केल्यावर, ती जवळून पाहिल्यावर त्या अनुषंगानं पुढील लेखनात मला हवा तसा वाव मिळत नव्हता. यातूनच काही वाद झाले आणि ते माझ्यासाठी अपमानास्पद होतं. म्हणून मी मालिका सोडायचा निर्णय घेतला.
- रोहिणी निनावे, लेखिका

लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि इतर संपूर्ण टीम एकत्र येऊन मालिका पुढे चालवत असते. लेखिका रोहिणी निनावे यांना मालिका सोडायची होती. त्यांचे मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमशी लेखनाच्या पातळीवर काही वाद होते. त्या कारणास्तव त्यांनी मालिका सोडली असावी.
निलेश मयेकर, व्यवसाय प्रमुख, झी मराठी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज