अ‍ॅपशहर

सिद्धार्थच्या ‘अ जेंटलमॅन’चा ट्रेलर पाहिलात का?

सिद्धार्थ आणि जॅकलिन यांच्या ‘अ जेंटलमॅन’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने टिपिकल कॉर्पोरेट ड्रेसमधला त्याचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटो प्रमाणे या ट्रेलरमध्ये देखील तुम्हाला सिद्धार्थचे ‘सुंदर, सुशील आणि धाडसी’ रूप पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the trailer of sidharth malhotra jacqueline fernandez starrer a gentleman released
सिद्धार्थच्या ‘अ जेंटलमॅन’चा ट्रेलर पाहिलात का?


सिद्धार्थ आणि जॅकलिन यांच्या ‘अ जेंटलमॅन’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने टिपिकल कॉर्पोरेट ड्रेसमधला त्याचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटो प्रमाणे या ट्रेलरमध्ये देखील तुम्हाला सिद्धार्थचे ‘सुंदर, सुशील आणि धाडसी’ रूप पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थचा या चित्रपटात डबलरोल आहे. गौरव आणि ऋषी अशी यांचा डबलरोल सिद्धार्थ साकारत आहे.या सिनेमात सिद्धार्थ गौरव नावाच्या तरुणाची भूमिका करत आहे, जो अतिशय साधासुधा, नाकासमोर चालणारा तरुण असतो. अमेरिकेत मायामी इथं राहाणाऱ्या सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व अतिशय कंटाळवाणं असतं. काव्या नावाच्या एकमेव तरुणीला (जॅकलिन फर्नांडीस) सिद्धार्थचा हा साधेपणा आवडत असतो. सगळं काही ठीक सुरू असतानाच एका चुकीच्या ओळखीमुळे या जंटलमनला म्हणजेच सिद्धार्थला स्वयंपाकाची भांडी टाकून हातात चक्क बंदूक धरावी लागते आणि स्वतःचं तसंच काव्याचं संरक्षण करावं लागतं, अशी या सिनेमाची साधारण कथा असल्याचं ट्रेलरवरून दिसतयं.



'अ जेंटलमॅन’ हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट असून येत्या २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज