अ‍ॅपशहर

'माझ्याकडं आयुष्यभर पुरतील एवढ्या ऑफर'

'मानवी इच्छांना बांध घालता येत नाही. त्या सतत वाढत असतात. छोट्याशा आयुष्यात जे जे जमेल ते करण्याची माणसाची इच्छा असते. मलाही वाटतं, येणाऱ्या सर्व ऑफरना होकार द्यावा. पण वेळेचं काय? तो आज माझ्या बाजूनं नाही...'

Maharashtra Times 14 Dec 2016, 3:03 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम time not on my side for all offers says amitabh bachchan
'माझ्याकडं आयुष्यभर पुरतील एवढ्या ऑफर'


'मानवी इच्छांना बांध घालता येत नाही. त्या सतत वाढत असतात. छोट्याशा आयुष्यात जे जे जमेल ते करण्याची माणसाची इच्छा असते. मलाही वाटतं, येणाऱ्या सर्व ऑफरना होकार द्यावा. पण वेळेचं काय? तो आज माझ्या बाजूनं नाही...'

ही खंत आहे हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांची. आज वयाच्या ७४व्या वर्षीही एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवतील एवढ्या चित्रपटांच्या ऑफर अमिताभ यांना येत आहेत. आपल्या ब्लॉगद्वारे त्यांनी सध्याच्या 'बिझी'नेसबद्दल चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. 'मला येत असलेल्या ऑफर्समुळं मी भारावून गेलोय. रोजच्या रोज नव्या कथा आणि कल्पना ऐकतोय. त्यातल्या काहींवर गांभीर्यानं विचारही करतोय. पण यातल्या मोजक्या ऑफर स्वीकारायचं म्हटलं तरी उरलेलं आयुष्य पुरणार नाही. त्यामुळं आवडलेल्या कथेला झटपट होकार आणि वेळेत अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही' असं त्यांनी म्हटलंय.

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ लवकरच राम गोपाल वर्माच्या 'सरकार ३'मध्ये दिसणार आहेत. आधीच्या 'सरकार' आणि 'सरकार राज'मध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभ यांच्या 'सरकार ३'मधील भूमिकेविषयी सिनेरसिकांना उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज