अ‍ॅपशहर

ट्रिपल एचनं म्हटला अमिताभचा 'तो' डायलॉग

'डब्ल्यूडब्ल्यूई'चा शहेनशाह ट्रिपल एच...तर दुसरीकडं बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन...'बस ये दो नाम ही काफी हैं!'... ट्रिपल एच डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगेतील डॉन...तर अमिताभ बॉलिवूडच्या वर्तुळातील डॉन...आता या दोघांमध्ये तुलना का केली जातेय, असा प्रश्न नक्कीच पडला असेल?

Maharashtra Times 16 Oct 2017, 11:17 am
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम triple h delivers the iconic amitabh bachchan dialogue from shahenshah and he was spot on
ट्रिपल एचनं म्हटला अमिताभचा 'तो' डायलॉग


'डब्ल्यूडब्ल्यूई'चा शहेनशाह ट्रिपल एच...तर दुसरीकडं बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन...'बस ये दो नाम ही काफी हैं!'... ट्रिपल एच डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगेतील डॉन...तर अमिताभ बॉलिवूडच्या वर्तुळातील डॉन...आता या दोघांमध्ये तुलना का केली जातेय, असा प्रश्न नक्कीच पडला असेल? पण त्याचं कारणही तसंच आहे. रेसलिंगच्या रिंगेतील या शहेनशाहनं बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनचा एक डायलॉग सादर करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

डब्ल्यूडब्ल्यूईच्या एका इव्हेंटच्या प्रमोशनसाठी माजी वर्ल्ड चॅम्पियन ट्रिपल एच नुकताच मुंबईत आला होता. यावेळी त्यानं एका मुलाखतीत बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चनचा एक डायलॉग सादर केला. खरं तर ट्रिपल एच भारत दौऱ्यावर खूप कमी वेळा आला आहे. पण तो हिंदीतून संवाद साधू शकतो. त्याचा अनुभव या इव्हेंटमधील एका मुलाखतीत आला. त्याला शहेनशाह या हिंदी चित्रपटातील अमिताभचा प्रसिद्ध डायलॉग सादर करण्यास सांगितलं. त्यानंही तो तितक्याच ताकदीनं सादर केला. आजपर्यंत अनेक विदेशी खेळाडूंनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. आता ट्रिपल एचचा 'रिश्ते में तो हम तुम्हारे...' हा डायलॉग ऐकून आगामी काळात तो एखाद्या चित्रपटात दिसला तर आश्चर्य वाटायला नको!


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज