अ‍ॅपशहर

'लक्ष्य'...तुषार कपूर लग्नाआधीच झाला बाबा

लग्नाआधी बाबा अन् त्यानंतर लग्न असं आपल्याकडं फारसं होत नसलं तरी बॉलिवूडमधील अभिनेता तुषार कपूरनं हे 'करून दाखवलं' आहे. तुषार खऱ्याखऱ्या आयुष्यात लग्नाआधीच बाबा झाल्यानं कपूर घराण्यात अनेक वर्षांनंतर चिमुकली पावले रांगताना दिसणार आहेत.

Maharashtra Times 27 Jun 2016, 5:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tusshar kapoor becomes a father
'लक्ष्य'...तुषार कपूर लग्नाआधीच झाला बाबा


लग्नाआधी बाबा अन् त्यानंतर लग्न असं आपल्याकडं फारसं होत नसलं तरी बॉलिवूडमधील अभिनेता तुषार कपूरनं हे 'करून दाखवलं' आहे. तुषार खऱ्याखऱ्या आयुष्यात लग्नाआधीच बाबा झाल्यानं कपूर घराण्यात अनेक वर्षांनंतर चिमुकली पावले रांगताना दिसणार आहेत.

मला ४० वर्ष पूर्ण होण्याआधी मी एका मुलाला दत्तक घेईल किंवा सरोगसीच्या माध्यमातून बाबा होण्याचं स्वप्नं सत्यात उतरवेल, असे संकेत तुषार कपूरने आपल्या मित्राला काही वर्षाआधीच दिले होते. तुषार कपूरनं सरोगसीद्वारे लग्नापूर्वीच बाबा होण्याचं स्वप्नं सत्यात उतरवलं आहे. तुषारने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाळाची प्रकती व्यवस्थित असून त्याचं नाव 'लक्ष्य' ठेवल्याची माहिती तुषारने दिलीय. ‘पिता होण्याचा अनुभव अत्यंत रोमांचकारी आहे. एका मुलाचा पिता होणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा आनंद व्यक्त करायला आपल्याकडं शब्द नाहीत, अशा भावना तुषारनं व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, आई शोभा कपूर यांनी सुद्धा आजी-आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. ‘आम्ही तुषारच्या निर्णयाचे स्वागत करतो. आमच्यासाठी हा सुखद अनुभव आहे. तुषार हा आमचा खूप गुणी मुलगा असून त्याने आतापर्यंत सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहे. तो आता वडिलांची भूमिकाही व्यवस्थित पार पाडेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे जितेंद्र-शोभा यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज