अ‍ॅपशहर

राणादा-पाठकबाई म्हणतायेत, 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट'

छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका चांगलीच गाजतेय. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीमध्ये चाहत्यांचाही जीव चांगलाच रंगलाय. अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली ही जोडी सध्या 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट' असं म्हणत निरोगी आयुष्याचे महत्त्व प्रेक्षकांना सांगतेय.

Maharashtra Times 12 Nov 2017, 3:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tuzyat jeev rangala actors promote healthy lifestyle
राणादा-पाठकबाई म्हणतायेत, 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट'

छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका चांगलीच गाजतेय. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीमध्ये चाहत्यांचाही जीव चांगलाच रंगलाय. अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली ही जोडी सध्या 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट' असं म्हणत निरोगी आयुष्याचे महत्त्व प्रेक्षकांना सांगतेय.

मालिकेतील राणादा अर्थात हार्दीक जोशीनं आपल्या फेसबुक पेजवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत अक्षया देवधर म्हणजेच मालिकेतील पाठकबाई सगळ्या चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहेत. काही तासांपूर्वी पाठकबाईंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता आणि 'वज्रकेसरी' स्पर्धेच्या तयारीसाठी राणादाचा डाएट प्लॅन बनवण्यासाठी मदत मागितली होती. हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी आपल्या लाडक्या राणादासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून डाएट प्लॅन पाठवायला सुरूवातही केली. अनेकांनी त्याला सायकल चालव, पोहायला जा, अशा टिप्सही दिल्या. महाराष्ट्रभारातून या व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल या जोडीनं पुन्हा एकदा फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. शिवाय 'तुम्ही फिट राहायला काय करता ते आम्हाला जरूर कळवा,' असे आवाहनही केलं आहे.

मालिकेत सध्या राणादाचा अपघात झाल्यानं त्याचा पायाला दुखापत झालीय, त्यामुळे तो मानाची 'वज्रकेसरी' स्पर्धा मुकणार अशी चिन्हं दिसत आहेत. मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकाची मदत घेत प्रेक्षकांशी फेसबुकच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याची 'हटके' कल्पना मालिकेच्या टीमनं शोधून काढलीय. परंतु, आता या 'हटके' कल्पनेचा प्रत्यक्षात टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांना किती फायदा होतो हे कळण्यासाठी वाट पाहावी लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज