अ‍ॅपशहर

वादग्रस्त 'पद्मावती' ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या सिनेमावर भारतातील काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये मात्र 'पद्मावती'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने कोणतीही काटछाट न सुचवता 'पद्मावती'च्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे.

Maharashtra Times 23 Nov 2017, 12:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uk censor board clears padmavati for release
वादग्रस्त 'पद्मावती' ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या सिनेमावर भारतातील काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये मात्र 'पद्मावती'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने कोणतीही काटछाट न सुचवता 'पद्मावती'च्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे.

ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर आता ब्रिटनमध्ये १२ वर्षाची मुलं आणि त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती हा सिनेमा पाहू शकणार आहे. 'पद्मावती'वरून भारतात वाद होण्यापूर्वीच ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाकडे हा सिनेमा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. नंतर भारतात या सिनेमावरून वादळ निर्माण झालं. काही संघटनांनी या सिनेमातील काही दृश्यांना आक्षेप घेतल्याने गुजरात, बिहारसह अनेक राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.

येत्या १ डिसेंबर रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार होता, मात्र भन्साळी यांनी ऐनवेळी माघार घेत या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी मिळणं हा नित्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचं भन्साळींच्या प्रोडक्शन हाऊसचं म्हणणं आहे. ब्रिटनशिवाय अन्य देशांच्या सेन्सॉर बोर्डाकडेही हा चित्रपट मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज