अ‍ॅपशहर

३ दिवसात १०० कोटींचा गल्ला

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता विजयचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मर्सल' या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसात शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

Maharashtra Times 22 Oct 2017, 5:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijay mersal earns 100 crore in 3 days beats rajnikant kabali
३ दिवसात १०० कोटींचा गल्ला


दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता विजयचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मर्सल' या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसात शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

दाक्षिणात्य अभिनेता विजयचा हा चौथा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. याआधी 'थुप्पक्की', 'काथी', 'ठेरी' या चित्रपटाचा समावेश असून आता 'मर्सल' या चित्रपटाने शंभर कोटी कमावले आहेत. या चित्रपटानं तामिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' आणि अजित कुमार यांचा 'विवेगम' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. आंतर्राष्ट्रीय बाजारात हा चित्रपट सध्या चांगली कमाई करतोय.

या चित्रपटात जीएसटीशी संबंधित एक डॉयलॉग असून तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हिरो विजय म्हणतोय, सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी आहे व तेथे मोफत मेडिकल सुविधा आहेत. तर भारतात औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे आणि येथे दारूवर कोणताही जीएसटी नाही. तसेच गोरखपूरमधील दुर्घटनेवर बोलतानाही यात दाखवले आहे. चित्रपटातील हे सीन वगळण्यात यावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर काँग्रेसने याला विरोध दर्शवला आहे.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज