मुंबई टाइम्स टीम
लवकरच येऊ घातलेल्या काही सिनेमांसाठी या स्टार्सनी आपल्या भूमिकांच्या वजनानुसार आपलंही वजन वाढवलंय अथवा कमी केलंय. त्यांच्या वजनाबरोबर खेळण्याचा सिनेमामध्ये प्रत्यक्षात काय परिणाम झालाय हे बघण्यासाठी मात्र आपल्याला थोडं थांबावं लागेल. तोवर ‘वेट’ अँड वॉच…
बॉलिवूडचे अनेक स्टार्स आपापल्या भूमिकांमध्ये जान ओतण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी अगदी खूप वजन वाढवण्यापासून ते अगदी सडसडीत, बारीक होण्यापर्यंत वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. लवकरच येऊ घातलेल्या काही सिनेमांसाठी या स्टार्सनी आपल्या भूमिकांच्या वजनानुसार आपलंही वजन वाढवलंय अथवा कमी केलंय. त्यांच्या वजनाबरोबर खेळण्याचा सिनेमामध्ये प्रत्यक्षात काय परिणाम झालाय हे बघण्यासाठी मात्र आपल्याला थोडं थांबावं लागेल. तोवर ‘वेट’ अँड वॉच…
रणदीप हुडा 'दो लफझों की कहानी' या रणदीप स्ट्रीट फायटरच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्याला वजन वाढवायचं होतं. मात्र ओमंग कुमार दिग्दर्शित आगामी 'सरबजीत'साठी या जाट अभिनेत्यानं सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यानं तब्बल १८ किलो वजन कमी केलंय. डॉक्टर असलेल्या बहिणीचा सल्ला घेत त्यानं स्वतःच्या शरीरावर मेहनत घेत हा बदल घडवून आणला होता.
आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट तर भूमिकेसाठी खूप मेहनत घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आगामी 'दंगल'निमित्त त्यानं आपल्या शरीरयष्टीवर काम केलं आहे. होता. तीन वयोगटांतल्या कुस्तीपटूची भूमिका साकारात असल्यानं त्यानं आधी २५ किलो वजन वाढवलं होतं. ज्यामुळे त्याचं वजन थेट ९५ किलो झालं. सध्या जोरात वर्कआऊट करत २५ आठवड्यांच्या कालावधीत त्याला हे वाढवलेलं वजन पुन्हा कमी करायचं आहे.
सलमान खान एरव्ही साधारण ८८ किलो वजन असलेल्या दबंग सलमान खाननं ‘सुलतान’निमित्त ९४ किलोंपर्यंत वजन वाढवलं होतं. कुस्तीपटूच्या भूमिकेत असल्यानं चित्रपटाच्या शूटिंगआधी त्यानं हे शरीर कमावलंय. नंतर पुन्हा याच चित्रपटातल्या एका भागासाठी त्याला वजन ७० किलोंवर आणायचं होतं.
आलिया भट 'हायवे'नंतर पुन्हा एकदा ही पटाखा गुड्डी आगामी 'उडता पंजाब'मध्ये नॉनग्लॅमरस रुपात दिसणार आहे. यात ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका बिहारी तरुणीच्या भूमिकेत आहे. त्यामुळे अर्थातच तिला यासाठी काही किलो वजन कमी करावं लागलं होतं. नेमका आकडा माहित नसला तरी शूटिंगच्या वेळेस तिनं साधारण १० ते १२ किलो वजन कमी केल्याची चर्चा आहे.
परिणीती चोप्रा आज बी-टाऊनच्या हॉट अभिनेत्रींमध्ये परिणितीचं नाव घेतलं जातंय. यामागचं कारण आहे तिनं स्वतःमध्ये घडवून आणलेला कमालीचा शारीरिक बदल. एकेकाळी ८० किलोंची ही अभिनेत्री आता एकदमच फिट अँड फाइन झाली आहे. आगामी 'मेरी प्यारी बिंदू'च्या शूटिंगनिमित्त तिनं खास ब्रेक घेऊन स्वतःचं वजन कमी केलं आहे.