अ‍ॅपशहर

...म्हणून मान्यता मुलांसोबत रोजच बोलायची खोटं!

सुमारे साडेतीन वर्षांची शिक्षा भोगून २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटलेला संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्या काही काळापर्यंतचा त्याचा प्रवास खूपच वादग्रस्त असा राहिला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना कूटुंबाला विशेष: त्याच्या दोन लहान मुलांना या गोष्टींचा त्रास होणार नाही याची काळजी संजय दत्तने घेतली होती.

Maharashtra Times 17 Sep 2017, 3:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when sanjay dutt was locked up in yerawada jail his wife had told his children that he was out of town shooting for his film
...म्हणून मान्यता मुलांसोबत रोजच बोलायची खोटं!


सुमारे साडेतीन वर्षांची शिक्षा भोगून २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटलेला संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. गेल्या काही काळापर्यंतचा त्याचा प्रवास खूपच वादग्रस्त असा राहिला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना कूटुंबाला विशेष: त्याच्या दोन लहान मुलांना या गोष्टींचा त्रास होणार नाही याची काळजी संजय दत्तने घेतली होती. पण मुलांना जेव्हा संजय दत्तची आठवण यायची तेव्हा मान्यता त्यांना ‘पप्पा शूटिंगला गेले आहेत’ असं सांगून त्यांची समजूत काढत असे. अशा अनेक गोष्टींचा खुलासा स्वत: संजय दत्तने एका मुलाखतीत केला आहे.

संजय दत्त कारागृहात होता तेव्हा मान्यताला कुटूंबाला सांभाळणं एक आव्हान होतं. अर्थातच तिनं हे आव्हान चोख पेललं. मुलांना घेऊन कधीच तुरूंगात येऊ नको असही त्यानं मान्यताला बजावलं होतं.या सोबतच संजय दत्तच्या ऑफिसची जबाबदारीही सांभाळली होती.

संजय दत्तला त्याच्या मुलाबद्दल विचारलं असता 'मला नाही वाटत की माझ्या मुलानं माझ्या पावलावर पाऊल ठेवावं .जे दुख: माझ्या वडिलांनी सहन केलं ते माझ्या वाट्याला येऊ नये हीच इच्छा असल्याचं संजय दत्तने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज