अ‍ॅपशहर

'पाळी आली असूनही त्यानं बलात्कार केला'

बलात्काराच्या आरोपांमुळे हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाइनस्टीनच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. हॉलिवूडमधील सहायक निर्माती मिमी हलेईनेही बलात्काराचा आरोप केला आहे.

Maharashtra Times 26 Oct 2017, 10:01 am
मटा ऑनलाइन वृत्त | लॉस एंजलिस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women accused harvey weinstein of raping her in 2006
'पाळी आली असूनही त्यानं बलात्कार केला'


बलात्काराच्या आरोपांमुळे हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाइनस्टीनच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. हॉलिवूडमधील सहायक निर्माती मिमी हलेईनेही बलात्काराचा आरोप केला आहे. २००६ मध्ये हार्वीकडे कामानिमित्त गेल्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला, त्यादरम्यान मला पाळी आली होती. पण त्याने कोणतीही दया दाखवली नाही, असे तिने सांगितले.

हार्वीचे हे कृत्य मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने धक्के मारत बेडरुममध्ये नेले. मला पाळी आली असतानाही त्याने बलात्कार केला, असे मिमी म्हणाली. हार्वीने एका खोलीमध्ये नेले. तिथे अंधार होता. बहुतेक ती खोली मुलांची होती. तिथे त्याने जबरदस्ती केली. मी त्याला खूप विरोध केला. त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही, असेही तिने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज