अ‍ॅपशहर

पाक कलाकारांसोबत काम करणार नाही: देवगण

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेता अजय देवगणने कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम न करण्याचा निर्धार केला आहे.

Maharashtra Times 7 Oct 2016, 5:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wont work with any pakistani actor ajay devgan
पाक कलाकारांसोबत काम करणार नाही: देवगण


उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेता अजय देवगणने कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम न करण्याचा निर्धार केला आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात ज्याप्रकारचं वातावरण आहे त्या स्थितीत पाक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणं योग्य ठरणार नाही, असे अजय देवगणने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

आपल्याकडून चर्चेची अपेक्षा केली जाते आणि दुसरीकडे सीमेवर गोळ्या झाडल्या जातात. एकाचवेळी या दोन गोष्टी कशा शक्य आहेत, असा सवाल करत पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरही अजय देवगणने तोफ डागली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज