अ‍ॅपशहर

'रंग प्रीतीचा बावरा' गाण्यात दिसला सोमनाथ अवघडेचा वेगळाच अंदाज

दिग्दर्शक सुनिल मगरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फ्री हिट दणका' या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातली मुख्य कलाकारांवर चित्रित झालेलं हे गाणं प्रेक्षकांवर प्रेमाची मोहिनी घालण्यासाठी सज्ज झालं आहे.

मुंबई- प्रेम म्हटलं की सगळ्यांचं मन मोहरून जात. प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्रेम. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम या विषयावर अनेक चित्रपट बनविण्यात आले. प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला. असाच एक प्रेमाचा अंकुर प्रेक्षकांच्या हृदयात रुजवण्यासाठी 'फ्री हिट दणका' हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. 'रंग प्रीतीचा बावरा' असे या गाण्याचे बोल असून चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेत्री अपूर्व एस आणि अभिनेता सोमनाथ अवघडे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम free hit danka song rang priticha bavra released
'रंग प्रीतीचा बावरा' गाण्यात दिसला सोमनाथ अवघडेचा वेगळाच अंदाज


'मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२०' मध्ये कलाकारांचा गौरव

या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण होते. महत्वाचं म्हणजे, हे गाणं लोकप्रिय गायक जसराज जोशी यांनी गायलं असून त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाची जादू गाण्यातून जाणवते. या गाण्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला स्वामी शैलेश नावाची १७ वर्षीय सुमधुर गायिका मिळाली. या गाण्याचं संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केलं असून गाण्याचे बोल संजय नवगिरे यांचे आहेत.



चित्रपटाचे दिग्दर्शक सुनिल मगरे यांनी या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. त्यांनी करोनाकाळात या गाण्याचं चित्रीकरण केलं, तेही संपूर्ण नियम पाळून. 'रंग प्रीतीचा बावरा' हे मोंटाज गीत असल्याने त्याच्या चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार होतं. एका सीनसाठी माणगंगा, पारनेर या भागात गेलो असतांना तिथे मोठ्या प्रमाणात साप फिरत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चित्रीकरण थांबवून सर्पमित्रांना बोलवून जाग पूर्णपणे सुरक्षित करून घेतल्यानंतरच त्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली. सकाळी सातला असणारं चित्रीकरण दुपारी बाराच्या सुमारास सुरु झालं. जया धोकादायक असूनही प्रत्येकाने हिमतीने आणि जिद्दीने चित्रीकरण पूर्ण केलं.

'गंगूबाई काठीयावाडी'साठी आलिया नव्हती निर्मात्यांची पहिली पसंती

हा चित्रपट एसजीएम फिल्म्स करत असून चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. अतुल रामचंद्र तरडे, आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे तर चित्रपटाचे छायाचित्रण वीर धवल पाटील यांचे आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

मोंटाज असल्याने वेगवेगळ्या ठिकाणांवर करावं लागलं चित्रीकरण
सापांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी केलं चित्रीकरण
१६ एप्रिल रोजी चित्रपट होणार प्रदर्शित

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज