अ‍ॅपशहर

५०० रुपयांसाठी नवऱ्यानं केला होता गंगूबाईचा सौदा, काय आहे तिची खरी कहाणी

अलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'गंगूबाई काठीयावाडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. त्यानंतर आता सोशल मीडियावर आलियाच्या नावापेक्षा गंगूबाई काठियावाडी यांच्या नावाची चर्चा आहे.

हायलाइट्स:

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गंगूबाई काठीयावाडी'चा टीझर झाला रिलीज
अलिया भट्ट साकारत आहे गंगूबाई काठीयावाडी यांची भूमिका
कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही गंगूबाई काठीयावाडी यांची कहाणी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गंगूबाई काठीयावाडी
मुंबई: संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठीयावाडी'चा टीझर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात गंगूबाई काठीयावाडी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. पण ही गंगूबाई काठीयावाडी नक्की होत्या तरी कोण? जाणून घेऊयात त्यांची खरी कहाणी...
गंगूबाई गुजरात मधील काठीयावाडी या ठिकाणी राहणाऱ्या होत्या असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना गंगूबाई काठीयावाडी असं नाव मिळालं. त्यांचं खरं नाव गंगूबाई हरजीवनदास काठीयावाडी असं होतं. पण त्यांची कहाणी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही.
करिनामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्या मैत्रीत आला होता दुरावा? वाचा नेमकं काय घडलं
View this post on Instagram A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)


गंगूबाई वयाच्या १६ व्या वर्षीच प्रेमात पडल्या होत्या. वडिलांच्या अकाउंटन्टवर त्या प्रेम करू लागल्या होत्या. त्या मुलासोबत लग्न करून त्या मुंबईला आल्या. त्यांनी नेहमीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हेमा मालिनी आणि आशा पारेख या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. पण त्यांच्या नशीबानं त्यांना साथ दिली नाही. त्यांच्या पतीनं त्यांचा विश्वासघात केला. त्यानं गंगूबाईंना मुंबईच्या कामाठीपुरा रेड लाइट भागातील एका कोठ्यावर अवघ्या ५०० रुपयांसाठी विकलं होतं.


हुसैन जैदी यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे माफिया डॉन करीम लाला यांच्या गँगमधील एका माणसाने गंगूबाईंवर बलात्कार केला होता. त्यानंतर गंगूबाईंनी करीम लालांची भेट घेत त्यांच्याकडे न्याय मागितला होता. त्यानंतर गंगूबाईंनी करीम लालांना राखी बांधली आणि ते त्यांचे भाऊ झाले. ज्यानंतर त्या पुढे जाऊन मुंबईमधील सर्वात मोठ्या लेडी डॉन झाल्या.


गंगूबाई काठीयावाडी मुंबईच्या कामाठीपुरा रेड लाइट भागात कोठा चालवत होत्या. पण या भागातील तसंच देहविक्री करणाऱ्या महिलांची मदत सुद्धा करत असत. कोणत्याही मुलीला इच्छेविरुद्ध त्या आपल्या कोठ्यावर ठेवत नसत असं म्हटलं जातं. आपल्याकडे असलेल्या पॉवरचा उपयोग त्यांनी वैश्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी केला. गंगूबाई काठीयावाडी चित्रपटाची कथा 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज