अ‍ॅपशहर

जॅकलिनने शेअर केला बोल्ड फोटो, खांद्यावरील व्रण पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या खांद्यावर हार्टच्या आकाराचं निशाण आहे. ते निशाण पाहून नेटकरी गोंधळात पडले आहेत. त्यांनी तिच्या फोटोवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हायलाइट्स:

जॅकलिनने शेअर केलेल्या बोल्ड फोटोत खांद्यावर दिसतंय निशाण
खांद्यावरील निशाण पाहून चाहते पडले बुचकळ्यात
चाहत्यांनी फोटोवर केला लाईक आणि कमेंटचा वर्षाव
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jacqueline fernandes share bold photo flaunts her heart shaped tatoo fans get confused
जॅकलिनने शेअर केला बोल्ड फोटो, खांद्यावरील व्रण पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सक्रिय असते. ती निरनिराळे फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या पोस्टना चाहते देखील भरपूर प्रतिसाद देत असतात. नुकताच जॅकलिनने तिचा एक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे काही चाहते मात्र थोडे गोंधळले आहेत. कारण, जॅकलिनच्या खांद्यावर एक निशाण आहे जे अगदी टॅटूप्रमाणे दिसत आहे.
Video- वरुणने हात जोडून चाहत्यांना केली मास्क लावण्याची विनंती

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या सेल्फीमध्ये तिच्या खांद्यावरील दिलच्या आकाराचा टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. त्यासोबतच तिच्या कमरेवरही तशाच प्रकारचे निशाण दिसत आहेत. हे निशाण पाहून तिचे चाहते पुरते गोंधळले आहेत. अनेकांनी तिच्याकडे त्याबद्दल विचारणा देखील केली आहे. परंतु, जॅकलिनच्या खांद्यावर एखादा टॅटू नसून ते निशाण तिला तिने घेतलेल्या कपिंग थेरपीमुळे मिळाले आहेत. जॅकलिनचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड पसंत पडला आहे. काही तासांतच या फोटोला १२ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

View this post on Instagram A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)



अनेक चाहत्यांनी जॅकलिनला या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जॅकलिनचा जवळचा मित्र अभिनेता अर्जुन बिजलानी याने देखील तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, 'हा तुझा दुसरा टॅटू आहे.' जॅकलिन लवकरच अक्षय कुमार आणि नुसरत भरुचा सोबत 'राम सेतू' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पीके' साठी सुशांतने घेतला नव्हता एकही पैसा; दिग्दर्शकानं दिली होती 'ही' खास भेट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज