अ‍ॅपशहर

'तुझ्या डोक्यातल्या विचारांचं लॉकडाउन झालंय', महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावलं

कंगना रनौटने पुन्हा एकदा लॉकडाउनच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ही टीका करताना तिने सरकारला चंगू-मंगू गँग म्हटल्यावरून तिच्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका होत आहे.

Lipi 13 Apr 2021, 4:54 pm
मुंबई : सोशल मीडिया, वाद, ट्रोलिंग आणि कंगना रणौत हे आताच्या काळातील एक नवीन समीकरण झाले आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर कंगना तिचे मत व्यक्त करत असतेच. भले त्या विषयाशी तिचा संबंध असो वा नसो पण आपलं मत व्यक्त करणं हा ती स्वतःचा हक्कच मानते. तिच्या या स्वभावामुळे सोशल मीडियावर ती अनेकदा ट्रोलही होते. पण या सगळ्याची पर्वा न करता ती आपलं मत व्यक्त करतच असते. आता ही पुन्हा कंगनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले असून 'तुझ्या विचारांचं लॉकडाउन झालं आहे...' असे युझरने तिला सुनावले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kangana ranaut tweet maharashtra government as changu mangu gang gets trolled
'तुझ्या डोक्यातल्या विचारांचं लॉकडाउन झालंय', महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावलं


बच्चन कुटुंबाकडे आहे लक्झरी गाड्यांचा ताफा, किंमत ऐकून येईल भोवळ

महाराष्ट्रासह देशामध्ये करोनाचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार राज्यात लॉकडाउन लावण्याचा विचारात आहे. त्यावर कंगनाने ट्वीट करत आपले मत व्यक्त केले. कंगनाने महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की, 'महाराष्ट्रात लॉकडाउन लागला आहे का, याबद्दल कुणी मला काही सांगेल का? हे सेमी लॉकडाउन आहे की खोटे लॉकडाउन आहे? नेमके काय सुरू आहे इथे? याबाबत कुणीच कठोरपणे निर्णय घेऊ इच्छित नाही. लोकांच्या डोक्यावर सातत्याने लॉकडाउनची तलवार लटकत असताना ही चंगू मंगू गँग आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आपण राहू की जाऊ, या विचारांनी ते त्रस्त झाले आहेत...'


कंगनाच्या या ट्वीटचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. सोशल मीडियावर कंगनाला खूप ट्रोल करण्यात आले आहे. एकाने कंगनाला सुनावत लिहिले की,' तू हा चंगू मंगू शब्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तर वापरलेला नाही ना?' दुसऱ्या युझरने लिहिले, 'महाराष्ट्रातील लॉकडाउन बाबात माहिती नाही परंतु कंगना तुझ्या मेंदूतील विचारांवर नक्कीच लॉकडाउन लागला आहे.'

'कोणत्या झोपडपट्टीतून उचलून आणलीए', दत्तक मुलीला ट्रोल करणाऱ्यांना मंदिरा बेदीचं सणसणीत उत्तर



कंगनाने आपले मत ट्वीट करून व्यक्त केल्यावंतर अशा पद्धतीने तिला ट्रोलिंगला सामारो जावे लागले आहे. काहींनी तर तिच्या सिनेमाचे रिलीज पुढे गेल्यामुळे तिची खिल्ली उडवली आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर 'थलायवी' हा तिचा सिनेमा २३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु करोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलेले आहे. याशिवाय ती धाकड आणि तेजस सिनेमांतही दिसणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज