अ‍ॅपशहर

मूर्ख- अशिक्षित म्हटल्यावर कंगनाचा झाला तिळपापड, युजरला दिलं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. प्रत्येक गोष्टीवर ती तिचं मतं व्यक्त करत असते. कंगनाच्या एका ट्विटवर एका पत्रकाराने तिला अशिक्षित व मूर्ख असल्याचं म्हटलं होतं. त्यावर कंगनाने त्याला चांगलचं प्रत्युत्तर दिलं.

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बिनधास्त असल्याने सहजासहजी कुणीही तिच्या वाट्याला जाण्याचा विचारही करत नाही. तिच्या फटकळ बोलण्याने ती समोरच्याची बोलतीच बंद करते. तिचं प्रत्येक मत कोणालाही न घाबरता ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रत्येक दिवशी ती नवीन ट्विट करत असते. कधी स्वतःची तुलना मोठमोठ्या कलाकारांसोबत करते. तर कधी तिला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेते. या वेळेसही तिने ट्विटरवर तिला मूर्ख म्हणणाऱ्या एका युजरला सुनावलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kangana ranaut tweeter replied to journalist on calling her uneducated
मूर्ख- अशिक्षित म्हटल्यावर कंगनाचा झाला तिळपापड, युजरला दिलं सडेतोड उत्तर


सोशल मीडियावर एका पत्रकाराने कंगनाला मूर्ख आणि अशिक्षित म्हटलं. त्यावर कंगना रागाने लाल झाली. तिने त्या पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या मते तिचे ट्विट हे जास्त बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींसाठी असतात. कंगनाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विरुद्ध एक प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेवर एका पत्रकाराने कंगनाच्या विरोधात ट्विट केलं आणि म्हटलं, 'ती एक मूर्ख, अशिक्षित आणि बावळट व्यक्ती आहे जिला वाटतं की, तिला सगळं काही माहीत आहे आणि तरीही ती रेड इंडियन सारख्या अपमानास्पद शब्दांचा वापर करते.'


हे ट्विट पाहिल्यावर कंगनाचा राग अनावर झाला आणि तिने त्याला उत्तर दिलं. तिने ट्विट करत लिहिलं, 'माझे ट्विट फक्त डोकं असणाऱ्या आणि उत्तम बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींसाठी असतात. मी इथे बसून प्रत्येक मूर्ख माणसाला समजावू शकत नाही. शब्द आणि वेळ जास्त नाहीये. तुम्ही कशासाठी उत्साहीत आहात? मी हे तुमच्यासाठी नाही लिहिलं. आणि रेड इंडियन्सचं काय? तुला तर हे देखील माहीत नाही की, ब्रँडो एक मूळ अमेरिकन आहे. चिल्लर..' असे अनेक ट्विट करत कंगनाने त्याची बोलती बंद केली आहे. कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर वायरल होत आहे.



गाडी घेतल्यानंतर सुव्रतनं घेतलाय महत्त्वाचा निर्णय; वाचून तुम्हीही कराल कौतुक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज