मुंबई- सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बाबतीत एक महत्वाची माहिती मिळते आहे. महेश यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याने उपचारासाठी त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या महेश यांची प्रकृती स्थिर असून ते राहत्या घरी विश्रांती घेत आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महेश यांना मूत्राशयाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. दहा दिवसांपूर्वी महेश यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. महेश यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून ते सध्या राहत्या घरी विश्रांती घेत आहेत. महेश यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही नाव कमावलं आहे. 'वॉन्टेड','रेडी', 'दबंग', 'जिंदा', 'मुसाफिर' आणि 'कांटे' या चित्रपटात भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोबतच छोट्या पडद्यावर महेश 'बिग बॉस मराठी' चं सूत्रसंचालन करताना दिसतात. लवकरच ते 'बिग बॉस मराठी' सीजन ३ चं सूत्रसंचालन करताना देखील दिसणार आहेत. यासोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने महेश यांनी 'व्हाइट' या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. याशिवाय महेश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर' याचीही निर्मिती करत आहेत.